राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहूरी फॅक्टरी येथील शिवचरित्रकार तथा समाजप्रबोधनकार हसन एम. सय्यद यांची देवळाली प्रवरा नगरपरिषदेने वतीने स्वच्छता ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहूरी फॅक्टरी येथील शिवचरित्रकार तथा समाजप्रबोधनकार हसन एम. सय्यद यांची देवळाली प्रवरा नगरपरिषदेने वतीने स्वच्छता दूत व पर्यावरण दूत (ब्रॅण्ड अँबेसेडर) म्हणून निवड केले असून या निवडीचे पत्र प्रांताधिकारी अनिल पवार, डॉ. दयानंद जगताप व मुख्याधिकारी अजित निकत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
राहूरी फॅक्टरी येथील शिवचरित्रकार हसन सय्यद महाराष्ट्र भर शिवविचारांचा जागर तसेच विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करत असतात, त्याच्या या कार्याची दखल घेत भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर शिवचरित्रकार हसन सय्यद यांची देवळाली प्रवरा नगरपरिषदेने ब्रॅण्ड अँबेसेडर म्हणून निवड केली आहे. या मार्फत त्यांना स्वच्छते विषयीचे वर्गीकृत कचरा देणे, होम कँपोस्टिंग, स्वच्छता अप, सार्वजनिक स्वच्छता राखणे, मैला वेळोवेळी उपसा करणे ई. बाबतीत देवळाली प्रवरा शहरातील लोकांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा २.० च्या धर्तीवर शिवचरित्रकार हसन सय्यद यांची देवळाली प्रवरा नगरपरिषदेने पर्यावरण दूत म्हणून निवड केली व त्याला अनुसरुन पर्यावरणाचे भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश, या पंच महाभूताच्या संवर्धन व सरक्षणासाठी वृक्षारोपण, प्लास्टिक बंदी, जलसंवर्धन, अक्षय ऊर्जेचा वापर, इंधन विरहित वाहनांचा वापर इ. विषयांची देवळाली प्रवरा शहरातील लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिवचरित्रकार हसन सय्यद यांची निवड करण्यात आली आहे.
या निवड प्रसंगी देवळाली प्रातांधिकारी अनिल पवार, डॉ. दयानंद जगताप, मुख्याधिकारी अजित निकत, नगरपालिकेचे कार्यलयीन अधीक्षक बन्सी वाळके, अभियंता अमोल दातीर, उदय इंगळे, राजेंद्र थिगळे यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत