कोपरगाव(वेबटीम) आज अखेर कोपरगाव शहराला खूप मोठं मोठे निधी आले आणि गेले , पण विकास झालेला गावात कुठेच दिसत नाही. जुने लोक व आपल्या गाव...
कोपरगाव(वेबटीम)
आज अखेर कोपरगाव शहराला खूप मोठं मोठे निधी आले आणि गेले , पण विकास झालेला गावात कुठेच दिसत नाही. जुने लोक व आपल्या गावातून गेलेले लोक , तरुण लोक म्हणतात की अमी लहाण पणापासून बघतो की गाव तसेच्या तसे व बाकीचे गावं , शहरे किती चांगल्या पद्धतीने सुधारली, तुमि कसे न काही बोलता राहतात कोपरगाव ला ? असे गावा विषयी प्रेम जिव्हाळा असल्या कारणाने बोलतात असे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी सांगितले.
कोपरगाव नगरपालिकेने , पालिके मार्फत ज्या कामांची उद्घाटन झाले , जी कामे चालू आहेत, या सर्वे कामाचे टेंडर किती रकमेचे आहे , त्या कामाची मुदत किती आहे आणि कॉन्ट्रॅक्टर /ठेकेदार चे नाव लिहून मोठे स्पष्ठ फ्लेक्स / बोर्ड लावावीत ....म्हणजे जनतेला कळेल , कोण काम ( ठेकेदार ) करत आहे आणि ते कळल्या मूळे त्यांनाही जाब विचारता येईल .तसेच नगरपालिकेत जनतेला टेंडर मध्ये काय काय दिले हे बघण्याची मुभा आणि काम झाल्या नंतर केलेले बिल , जेव्हा पाहिजे तेव्हा विनाशुल्क , विनाअडवता नागरिकांना बघायला मिळावे. तरच कामे चांगले होतील व कोपरगाव नागरिकांची त्यातल्या त्यात निदान रस्ते आणि पाणी या त्रासाची अनेक वर्षांची साडेसाती जाऊ शकते /जाईल. खरे तर टेंडर मधील सर्वे दिलेली ऐटम किंवा टेंडर संपूर्ण मोठा फ्लेक्स वर छापून त्या कामाच्या ठिकाणी , काम संपल्यावर बिल होई परियन्त लावावेत , ठेवावेत. तरच कामे देर्जेदर होतील आणि जनतेला होणाऱ्या मरणयातना त्रासातून कायमची मुक्तता होईल आणि नगरपालिकेत पारदर्शकता येईल.अन्यथा कामे होत जातील आणि गाव कधीही निकृष्ट कामातून सुधारनार नाही.
हाच शेवटचा पर्याय कोपरगाव शहरासाठी राहिलेला आहे अन्यथा मोठं मोठे निधी येतील जातील आणि गाव अशेच धूळ , खड्डे असणारे रस्ते , अस्वच्छ व ८ ,१० , २१ दिवसांआड पाणी , लहान मुलांना उद्यान , बगीचा नसणारे , जेष्ठां साठी सेपरेट वाँकिंग ट्रॅक नसणारे कायमचे राहील.
उदघाटन होऊन काम सुरू झाले नाही , जसे नाट्यगृह चे १ कोटी रुपयांचे आजून काम सुरू झाले नाही .व छोटे मूले व नाट्य प्रेमी यांचे आयुष्यातुन गेलेले दिवस , लहानपनी मुलांच्या कलागुणांना वाव द्यायच्या वेळी नाट्यगृह , स्टेज नसल्याने , ही गेलेली वेळ परत कधीच त्यांच्या आयुष्यात परत येणार नाही .
जसे ४९ कोटी रुपये युन संपले तरी शहरांसाठी स्वच्छ व रोज किंवा दिवसाआड पाणी ज्या मूळे देता अली असती ती योजना चालू झालीच नाही. काही वर्षांपूर्वी येसगाव येथील ४ नंबर च्या साठवण तळ्याचे अर्धवट राहिलेले काम , की ज्या मुळे ५ नंबर तळ्याच्या २५ एकर जागेवर टाकलेले ४ नंबर तळ्याच्या खोद कामाचे मटेरियल मुळे ५ नंबर तळ्याचे काम होण्यास जनतेला मोठा लढा उभारावा लागला, नाईलाजाने करावा लागला , त्यात वेळ जाऊन इस्टिमेट वाढले गेले , ४ नंबर तळ्यांचे काम ही अर्धवट राहिले जनतेचा आणि नगरपालिकेचा जनतेच्या टॅक्स / घरपट्टी / पाणीपट्टी मधील कष्ठाचे हक्कांचे पैसे वाया जाऊन, पाण्याची नागरिकांना / माताभगिनींना/ लहान मुलांचे हाल अपेष्टा सहन करावी लागत आहे / लागेली. आणि आता नगरपालिकेच्या पदाधिकारी याची ५ वर्ष काळाची २०१६ ते २०२१ ही मुदत / टर्म संपली .
आत्ता तर नगरपालिकेची निवडणूक ओबीसी आरक्षण मुद्द्या सुटल्या शिवाय घेऊ नये असे सरकारने विधिमंडळ।त नुकतेच सर्वानुमते ठरवले आणि वाढत असलेला कोरोना व ३ ( तिसरी )लाट या मूळे निवडणूक बरीच महिने कदाचित होऊ शकणार नाही असे दिसते ,अश्या वेळी कोणाला कामाबाबत जाब विचारणार असा प्रश्न येतो / येईल आणि म्हणून निदान यावेळेपूर्ती तरी ही फ्लेक्स लावायची गरज आहे.
तसेच पालिकेनी आत्ता चालू केलेली कामे लवकर व चांगल्या दर्जाचे करावे , ते करत असताना जनतेला त्रास होणार नाही , याची ही काळजी घ्यावी.कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि ज्या मूळे शहराची बाजारपेठ सुधारू शेकते आणि तरुणांना कायमस्वरूपी काम , व्यापार सुधारण्यासाठी हाच शेवटच्या १००% एकमेव पर्याय उरला आहे , म्हणजे निकृष्ठ कामे होणार नाही आणि पूर्वीचे कॅलिफोर्निया व्हायला सुरुवात होईल आणि तरुण मुलं गाव सोडून जाणार नाही ,आपल्या आई , वडीला बरोबर राहून , कोपरगाव ला लागलेले , रिटायर्ड लोकांचे गाव व धुळगाव हे शब्द कायमचे पुसले जाईल.
प्रत्येक पक्ष्याचे माजी.आजी.लोकप्रतिनिधी ( आमदार ) ताई , दादा यांनी शहरांसाठी भरपूर निधी आणला आहे आणि आणत आहे .या सर्व निधींतुन चांगल्या दर्जाचे दर्जेदार कामे झाले पाहिजे , करून घेतले पाहिजे , नाहीतर निधी येतील जातील आणि दर्जाहीन चुकीचे खराब कामे झाले तर गाव आहे तिथेच तसेच राहील .
कोपरगावच्या नागरिकांनी ही मागणी लावून धरावी , अन्यथा गावात दर्जेदार कामे होणार नाही आणि गाव माघे पडून , कधीच सुधारू शकणार नाही .आपल्या गावासाठी , तरूनपिढी साठी, गावाची बाजारपेठ कायमस्वरूपी सुधारण्यासाठी हया नवीन वर्षात २०२२ सालात हा नवा पायंडा पडावा ,सुरवात करावी हीच खरी नवीन वर्षाची कोपरगाव शहरातील नागरिकांना खऱ्या अर्थाने कोपरगाव नगरपालिके तर्फे भेट राहील असे मंगेश पाटील म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत