अहमदनगर(वेबटीम):- कोरोनाच्या संसर्गाचा फटका राज्यातील मंत्र्यांना व आमदारांना बसत आहे. बुधवारी ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिट...
अहमदनगर(वेबटीम):-
कोरोनाच्या संसर्गाचा फटका राज्यातील मंत्र्यांना व आमदारांना बसत आहे. बुधवारी ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह त्यानंतर गुरुवारी सकाळी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर सायंकाळी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी त्याना कोरोनाची लागण झाल्याची माहिती फेसबुक वर दिली आहे त्यात त्यांनी म्हंटले की ”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही. तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत