संगमनेर(वेबटीम):- संगमनेर येथील लेखक, गीतकार, कवी सागर ज्ञानेश्वर साठे यांना 'कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन' यांच्या...
संगमनेर(वेबटीम):-
संगमनेर येथील लेखक, गीतकार, कवी सागर ज्ञानेश्वर साठे यांना 'कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन' यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतीय चिञपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोककवी वामन दादा कर्डक, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, कवी वसंत बापट, कवयित्री बहिणा बाई चौधरी यांच्या जयंती व स्मृती दिना निमित्ताने नाशिक येथे देण्यात येणारा "राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार" जाहिर झाला असून सागर साठे यांच्या कामाची दखल कलावंत विचार मंचने घेतली व दिनांक २६/१२/२०२१ रोजी "राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार" कलावंत विचार मंचचे अध्यक्ष मा. सुनिल मोंढे सर व संस्थेतील इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर करण्यात आला.
लेखक, गीतकार, कवी सागर साठे यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. प्रथम निसर्गाच्या ज्योती हा काव्यसंग्रह ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. श्री. डॉ श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला होता. तसेच विविध चित्रपट निर्मिती संस्थेसाठी कथा, पटकथा, संवाद व गीत लिहीत असल्याचे स्पष्ट केले.
लेखक सागर साठे यांचे साहित्य १००० हून अधिक कविता, ४० हून अधिक गीत, 12 लघुपट कथा, पटकथा, संवाद व यात ४ बिग बजेट चित्रपटांचा समावेश आहे. इतर साहित्य प्रकाशित व अप्रकाशित असल्याचे स्पष्ट केले. या सर्व कार्याची दखल कलावंत विचार मंचने घेतली याबद्दल सागर साठे यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत