अहमदनगर/वेबटीम:- डॉ.विजय मकासरे यांच्या तक्रार अर्जाची पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दखल घेऊन पो.नि.श्रीहरी बहिरट यांच्या विरोधात कारवाईचे आद...
अहमदनगर/वेबटीम:-
डॉ.विजय मकासरे यांच्या तक्रार अर्जाची पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दखल घेऊन पो.नि.श्रीहरी बहिरट यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिल्याने पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
राज्यात गाजलेल्या ५४ लाखांच्या गुटखा प्रकरणात पो.नि.श्रीहरी बहिरट यांनी मूळ आरोपींना पाठीशी घातल्या मुळे डॉ.विजय मकासरे यांनी सदर प्रकरणाची चौकशीची मागणी पोलीस आयुक्त पुणे शहर, पुणे यांच्याकडे केली होती.
विशेष पोलीस निरीक्षक यांनी चौकशी नेमून श्रीहरी बहिरट यांची वेतन वाढ रोखण्याचे आदेश दिलेले आहेत.त्यामध्ये अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे श्रीहरी बहिरट यांच्याकडून सदर प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला होता.याचा आकस, राग, द्वेष,मनात ठेवुन श्रीहरी बहिरट यांनी डॉ.विजय मकासरे यांच्यावर भा.द.वि.३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यानच्या काळात श्रीहरी बहिरट यांनी श्रीरामपूर येथे कार्यरत असताना बेकायदेशीर पोलीस चौकी उभारली या बेकायदेशीर पोलीस चौकी विरोधात डॉ.विजय मकासरे यांनी दिनांक २ डिसेंबर २०२० रोजी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर, पुणे येथे श्रीहरी बहिरट यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता.
त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पुणे शहर, पुणे यांनी एक परिपत्रक (पोलीस नोटीस, प्राथमिक चौकशी) जारी केले आहे.सदर परिपत्रकानुसार श्रीहरी बहिरट यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस आयुक्त पुणे शहर,पुणे यांनी श्रीहरी बहिरट यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहे.तसेच यापूर्वीही श्रीहरी बहिरट यांना अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे पोलीस खात्यांतर्गत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांच्याकडे चौकशी करण्याची तक्रार केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत