मोकळ्या मैदानास माता रमाई आंबेडकरांचे नाव द्या! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मोकळ्या मैदानास माता रमाई आंबेडकरांचे नाव द्या!

  कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव शहराला ऐतिहासिक वारसा असून, अनेक महापुरुषांची नावे इमारती, रस्ते, उद्यान यांना दिलेली आहे. त्याप्रमाणेच माता र...

 कोपरगाव/प्रतिनिधी:-


कोपरगाव शहराला ऐतिहासिक वारसा असून, अनेक महापुरुषांची नावे इमारती, रस्ते, उद्यान यांना दिलेली आहे. त्याप्रमाणेच माता रमाई आंबेडकर यांचे तहसील कार्यालयाच्या पूर्वेस असलेल्या मोकळ्या मैदानास नाव द्यावे, अशी मागणी संविधान चौकाचे संस्थापक अध्यक्ष नितीन शिंदे यांनी पालिकेकडे निवेदनातून केली आहे.


याबाबत बुधवारी (ता.1) नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सद्यस्थितीत शहरात अनेक व्यापारी संकुल, उद्यान, रस्ते, इमारती यांना महापुरुषांची नावे दिलेली आहेत. तसेच पुतळेही बांधलेले आहेत. त्याप्रमाणेच माता रमाई आंबेडकर या देखील महान व्यक्तिमत्त्व आहेत. 


त्यामुळे तहसील कार्यालयाच्या पूर्वेस असलेल्या मोकळ्या मैदानास माता रमाई आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी समस्त आंबेडकरी अनुयायांची इच्छा आहे. याचा आपण सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा, अशी मागणी संविधान चौकाचे संस्थापक अध्यक्ष नितीन शिंदे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत