राहुरी(वेबटीम):- पाण्याचा व रासायनिक खताच्या अती वापरामुळे जमिनीचा पोत खराब झाल्याने शेतकऱ्यांनी यापुढे ठिबक व सेंद्रिय खताचा वापर करण्याच...
राहुरी(वेबटीम):-
पाण्याचा व रासायनिक खताच्या अती वापरामुळे जमिनीचा पोत खराब झाल्याने शेतकऱ्यांनी यापुढे ठिबक व सेंद्रिय खताचा वापर करण्याचे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी जी पाटील ह्यांनी केले.
डॉ दादासाहेब तनपुरे फलोत्पादन प्रक्रिया सहकारी संस्थेच्या खत डेपोचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे होते. यावेळी संस्थेचे चेअरमन संतोष तनपुरे व्हॉइस चेअरमन गोरक्षनाथ खडके उपस्थित होते.
कुलगुरू डॉ पाटील म्हणाले, डॉ दादासाहेब तनपुरे ह्यांनी तालुक्याला दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम केल्याने आज राहुरी तालुक्यास वैभव प्राप्त झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्याग केल्याने कृषी विद्यापीठ, मुळा धरणासाठी जो त्याग केल्याने ह्या संस्था उभ्या राहिल्या. बाजार समितीने कांदा मार्केटचे नाव जिल्ह्यात राज्यात नव्हे तर देशात नावलौकिक मिळविला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने पुढाकार घेऊन ऊस सोयाबीन कपाशी तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मेळावा घ्यावा त्यासाठी मी स्वतः उपस्थित राहुरी मार्गदर्शन करेल.
बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे ह्यांनी आपल्या भाषणात डॉ दादासाहेब तनपुरे फलोत्पादन प्रक्रिया संघांची स्थापना स्व भांडवलावर झाली असून ह्या संस्थेस माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांचे मार्गदर्शना खाली सुरु असून अतिशय अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना खताचा पुरवठा केला आहे.
यावेळी पंढरीनाथ पवार रखमाजी जाधव ह्यांनी भाषण केले.प्रास्ताविक गणेश म्हसे सर ह्यांनी संस्थेच्या आर्थिक व कामाची माहिती दिली.
यावेळी बाजार समितीचे संचालक रमेश पवार , अण्णासाहेब बाचक र के एम पानसरे , ताराचंद तनपुरे , रमेश पवार , बापूसाहेब गागरे ,गणेश खेवरे, दत्तात्रय खुळे , नगरपालिकेचे नगरसेवक दिलीप चौधरी सूर्यकांत भुजाडी अशोक आहेर संचालक विजय वाबळे बाळासाहेब कदम बाळासाहेब पेरणे भानुदास लांडगे बाळासाहेब काळे जालिंदर काळे मच्छिन्द्र शिंदे नवाज देशमुख डी आर पानसंबळ किशोर जाधव ज्ञानदेव नालकर केशवराव पानसंबळ नारायण जाधव वसंतराव गाडे श्रीराम गाडे सोपानराव तनपुरे शंकरराव गावडे संदीप सोनवणे वसंतराव मेहेत्रे कृषी अधिकारी अनारसे सचिव नामदेवराव काळे आदिसह शेतकरी व्यापारी उपस्थित होते. व्हॉइस चेअरमन गोरक्षनाथ खडके ह्यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत