नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांना चिंतेचे कारण नाही, विकासासाठी आम्ही त्यांच्याबरोबर- विखे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांना चिंतेचे कारण नाही, विकासासाठी आम्ही त्यांच्याबरोबर- विखे

राहुरी फॅक्टरी( वेबटीम):-   नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी विकास कामांच्या माध्यमातून जनता जनार्दनाच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आह...

राहुरी फॅक्टरी( वेबटीम):-


 नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी विकास कामांच्या माध्यमातून जनता जनार्दनाच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषद ही राज्याच्या पटलावर अधिक पुढे नेण्याचे काम सत्यजित कदम यांनी केल्याने त्यांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. विकास कामांसाठी आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर राहू त्यांनी आपल्या विकास कामांचा धडाका सुरु ठेवावा असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.


  देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत देवळाली प्रवरा शहरामध्ये सुमारे ५० कोटी रुपये खर्चून होणाऱ्या भूमिगत गटारी मलनिस्सारण कामाचा भूमिपूजन समारंभ राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच शिर्डी संस्थान चे माजी उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.



यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की , काळाची पावले ओळखून सत्यजित कदम यांनी हा प्रकल्प हाती घेतला ही बाब अभिनंदनीय व ग्राम विकासाचा मंत्र देणाऱ्या गाडगे महाराजांच्या स्मृतिदिनी हा कार्यक्रम घेतला ही उल्लेखनीय बाब आहे. आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या जुन्या जाणत्यांना युवापिढीने आठवणीत ठेवली पाहिजे टीका होत राहणार आहे. मात्र टीका आपण मनोरंजन म्हणून घ्यावी व आपली विकास कामे सुरू ठेवावीत विकास कामाचा वसा तुम्ही घेतल्याने आम्ही देखील तुम्हाला सहकार्याची भूमिका ठेवून सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सत्यजित नगराध्यक्ष म्हणून बसलेला आहे. त्यामुळे त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही चंद्रशेखर कदम यांना आमदार करण्याची जबाबदारी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी माझ्यावर दिली होती , ती पार पाडून चंद्रशेखर कदम हे आमदार झाले तो माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होता राज्यातील अग्रगण्य नगरपरिषद असा देवळाली नगरपरिषदेचा नावलौकिक आहे. तो नेहमीच उंचावत जावा यासाठी पाहिजे ते सहकार्य करण्याची भूमिका आम्ही नक्कीच घेऊ सत्यजित कदम यांनी जिद्दीने व धडाडीने आपली कामे सुरू ठेवावीत आमचा आशीर्वाद नक्की त्याच्या बरोबर आहे. 



यावेळी विखे यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका करताना हे सरकार अधिवेशन दोन वर्षापासून घेत नाही ह्या शासनाची दुर्दशा अतिशय वाईट आहे शासनाला कोणतेही निर्णय घेता येत नाहीत त्यामुळे महाराष्ट्राची अधोगती होत आहे असे सांगताना आघाडी सरकारवर सडकून टीका केली.



 यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना चंद्रशेखर कदम यांनी सांगितले की सत्तेच्या माध्यमातून विखे घराण्याने विकास करून दाखवला आहे सत्यजित ने देखील सत्तेच्या माध्यमातून देवळाली प्रवरा शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला देवळाली व राहुरी फॅक्टरी या परिसराला विकास कामाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न सतत प्रयत्न केला आहे सर्वांगीण विकास करणे हा कदम घराण्याचा नेहमीचा प्रयत्न आहे . स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील व सूर्यभान वहाडणे यांच्यामुळे मी आमदार झालो या दोन्ही घरांविषयी मला मोठे प्रेम आहे आमदार विखे हे आमदार न राहतात लवकरच पुन्हा नामदार दिसतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यांच्या माध्यमातून देवळाली प्रवरा शहराचा विकास आम्हाला करता येईल व विकास कामे त्यांच्याकडून करून घेता येतील असा आम्हाला विश्वास आहे.



यावेळी बोलताना नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले की,  देवळाली प्रवराचा नगराध्यक्ष झाल्यानंतर मी विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून शहर विकासासाठी प्रयत्नशील राहिलो सत्तेचा वापर लोकहितासाठी केला . माझ्यावर कोणी टीका केली तरी मी त्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे शहरवासीयांचे मोठे प्रेम माझ्यावर आहे. या पाच वर्षांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित जी विकास कामे करून दाखविली.



 देवळाली प्रवरा शहर हे केवळ राज्यातच नव्हे तर देशामध्ये सर्वोच्च स्थानी नेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे  आम्ही विकास कामे करतोय त्यामुळे ज्यांना ये खपत नाही त्यांनी आमच्यावर टीका केली तरीदेखील आम्ही त्यास घाबरत नाही. आवश्यक वेळी त्यांना आम्ही पाहिजे ते उत्तर देऊ आमची बांधिलकी शहरवासीयांची आहे.



यावेळी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे विवेकानंद नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्ह़से, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, कारखान्याचे संचालक सुरसिंगराव पवार, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम तांबे , नानासाहेब गागरे , माजी नगराध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे सोसायटीचे चेअरमन राजेंद्र ढुस , माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक प्रकाश संसारे , गटनेते सचिन ढुस , बांधकाम समितीचे चेअरमन ज्ञानेश्वर वाणी , महिला व बालकल्याण समितीच्या चेअरमन नंदाताई बनकर , नगरसेवक शिवाजीराव मुसमाडे , बाळासाहेब खुरूद संजय बर्डे, नगरसेविक संगीता चव्हाण, बेबीताई मुसमाडे , सुजाता कदम , कमलबाई सरोदे, सुधाकर कदम, भाजप शहराध्यक्ष वसंत कदम, अजित कदम, शहाजी कदम, सोपानराव शेटे, संदीप कदम, प्रशांत कोठुळे, सचिन कोठुळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी वृंदावन कॉलनीच्या वतीने विखे व नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचा सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अधिकारी अजित निकत यांनी केले तर आभार सचिन ढुस यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत