दक्षिण नगर जिल्ह्यात आर.पी. आंबेडकर गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दक्षिण नगर जिल्ह्यात आर.पी. आंबेडकर गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी

  राहुरी(प्रतिनिधी):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचे हात बळकट करण्यासाठी दक्षिण नगर जिल्ह्यात...

 राहुरी(प्रतिनिधी):-


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचे हात बळकट करण्यासाठी दक्षिण नगर जिल्ह्यात गावागावात कार्यकर्त्यांचे संघटन करून मोठी चळवळ उभी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी केले.



 दक्षिण नगर जिल्ह्यात आरपीआय आंबेडकर गटाच्या पदाधिकारी निवडी व कार्यकर्ता संपर्क अभियानप्रसंगी पगारे बोलत होते.


 नगर तालुकाध्यक्षपदी वसीमभाई खान, यांची तर अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी नईमभाई खान व पाथर्डी तालुकाध्यक्ष पदी बाबासाहेब तिजोरे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र त्यांना दक्षिण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे व जिल्हा सचिव राजन ब्राम्हणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


 पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात महानगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकी आरपीआय आंबेडकर गट स्वबळावर लढविणार आहे.त्यादृष्टीने जिल्हा पातळीवर सर्वत्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे संघटन निर्माण करण्याचे काम सुरू आहे.


यावेळी नगर शहराध्यक्ष हरिष आल्हाट, राहुरी तालुकाध्यक्ष प्रतीक खरात आदिंसह डॉ. योगेश पगारे, गणेश डावखर,प्रकाश तिजोरे , सतीश तिजोरे, मनोहर तिजोरे, अनिकेत तिजोरे, बाबासाहेब पगारे, विशाल गायकवाड, आतिष साळवे, राहुल पोटे,सोहेल शेख, यासीर शेख,तन्वीर शेख, अफशान शेख तसेच राहुरी,पाथर्डी व नगर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत