आंबी : (संदिप पाळंदे) कधी नव्हे ती काँग्रेसच्या विचारांची आज देशाला सर्वाधिक गरज आहे असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले. करंजगाव येथ...
आंबी : (संदिप पाळंदे)
कधी नव्हे ती काँग्रेसच्या विचारांची आज देशाला सर्वाधिक गरज आहे असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले. करंजगाव येथे काँग्रेस पक्षाच्या ग्राम शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
केंद्रामध्ये भाजपचे सरकार आल्यापासून देशांमध्ये एकांगी आणि दुसऱ्याला तुच्छ लेखणाऱ्या संकुचित विचारसरणीने थैमान घातले आहे. वास्तविक हा देश बळीराजाचा अनेकविध धर्माचा आणि गुण्या-गोविंदाने नांदणाऱ्या संस्कृतीचा आहे. येथील विविधतेमध्ये काँग्रेस नेत्यांनी एकता निर्माण केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. वास्तविक भारतीय संविधानाने देशाला लोकशाही, बंधुभाव, समता आणि विविध प्रकारचे स्वातंत्र्य दिले. आज भारतीय जनता पक्षाचे नेते स्वतःची हुकूमशाही, दुसऱ्या धर्माचा द्वेष, मुक्तपणे सत्य सांगणाऱ्यांना देशद्रोही ठरवीत आहे. इम्पिरिकल डाटा केंद्रसरकारकडे असूनही सुप्रीम कोर्टाला न दिल्याने ओबीसीचे आरक्षण गेले. यावरून भाजपाला समतेसाठी सुरू झालेले आरक्षणच संपवायचे आहे हे स्पष्ट होते. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन इथे काँग्रेसची शाखा निर्माण केली. आता येथील जाणत्या कार्यकर्त्यांनी गोरगरिबांची कामे करावीत. करजगाव छोटे गाव असूनही याठिकाणी तीन रस्ते आणि इतर अनेक विकासकामे मार्गी लावले आहेत. त्यांचा दर्जा उत्तम राहील आणि गोरगरिबांना या विकास योजनांचा फायदा होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे आवाहनही आमदार लहू कानडे यांनी केले.
याप्रसंगी सरपंच शनिफ पठाण, माजी सभापती वेणूनात कोतकर, अप्पासाहेब बेंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले. यावेळी उपसरपंच गणेश कोतकर, नानासाहेब कोतकर, अशोक लोंढे, बाबासाहेब कोतकर, गनी गुरुजी, साईराम कोतकर, अण्णासाहेब देठे, नवनाथ कोतकर, बाळासाहेब काळे, नुरभाई सय्यद, बाळासाहेब लोंढे, सुनील शिंदे, योगेश आरंगळे, काँग्रेस ग्राम शाखेचे पदाधिकारी सचिन लोंढे, सुधाकर लोंढे, हर्षल कोतकर, पोपटराव कोतकर, बाळासाहेब गायके ,रवींद्र कोतकर, अनिल कोतकर ,रवींद्र कोतकर, संजय बेंद्रे, आप्पासाहेब गायके, बाळासाहेब लोंढे, विसरत पठाण, अरुण तुपे प्रवीण बेंद्रे, संभाजी कोतकर, राजेंद्र कोल्हे, दादासाहेब गायके तसेच करजगाव, बोधेगाव, जातप, लाख पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत