कोपरगाव पालिकेचा अजब कारभार; स्वयंचलित सॅनिटायझर मशीन बंद! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव पालिकेचा अजब कारभार; स्वयंचलित सॅनिटायझर मशीन बंद!

कोपरगाव/प्रतिनिधी:- सध्या सुरू असलेली कोरोना महामारी नियंत्रित आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोपरगावमध्ये प्रशासनाच्य...

कोपरगाव/प्रतिनिधी:-


सध्या सुरू असलेली कोरोना महामारी नियंत्रित आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोपरगावमध्ये प्रशासनाच्या उदासीनतेचा प्रकार समोर आला आहे. दस्तुरखुद्द नगरपालिकेच्या आवारातील स्वयंचलित सॅनिटायझर मशीन गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असल्याचे वास्तव चित्र आहे. यामुळे नागरिकांकडून पालिकेच्या उदासीन कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जगभरात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक केलेले आहे. याचबरोबर अनेक निर्बंध शिथील केल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. खासगी व सरकारी आस्थापना पूर्ण क्षमतेने सुरू होण्याबरोबर धार्मिक स्थळेही खुली झालेली आहेत. मात्र, कोविड नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासनाला सरकारने आदेशित केलेले आहे. तरी देखील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. यावर प्रशासन दंडात्मक कारवाई देखील करत आहे.

ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता कोपरगाव पालिका देखील नियमांचे उल्लंघन करणार्‍यावर ‘वॉच’ ठेवून आहे. परंतु, नागरिकांकडून उल्लंघन झाल्यास दंड वसूल करणारा पालिकेचा आरोग्य विभागच नियमांना तिलांजली देतानाचे वास्तव चित्र समोर आले आहे. पालिकेच्या आवारातील स्वछता विभागाच्या प्रवेशद्वारासमोरील भिंतीला लावलेले स्वयंचलित सॅनिटायझर मशीन हे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. नगरपालिकेत दररोज विविध कामानिमित्त हजारो नागरिकांची ये-जा असते. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझर वापरुन आत प्रवेश करणे बंधनकारक केलेले आहे. मात्र, एरव्ही सर्वसामान्यांना नियमांचे पालन करणारी पालिकाच नियमांना तिलांजली देत असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासाठी जबाबदार अधिकार्‍यावर मुख्याधिकारी शांताराम गोसावी कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत