देवळाली प्रवरात अनेकांना लागले नगरसेवक होण्याचे वेध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात अनेकांना लागले नगरसेवक होण्याचे वेध

देवळाली प्रवरा(वेबटीम):-   देवळाली प्रवरा नगरपालिकेतील सत्ताधांऱ्याची मुदत २४ डिसेंबर रोजी संपणार असल्याने इच्छुक उमेदवारांसह शहरवासीयांचे ल...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-

 






देवळाली प्रवरा नगरपालिकेतील सत्ताधांऱ्याची मुदत २४ डिसेंबर रोजी संपणार असल्याने इच्छुक उमेदवारांसह शहरवासीयांचे लक्ष प्रभागरचना व आरक्षणाकडे लागली आहे. ओबीसीच्या जागेवर सर्वसाधारण जागा निवडणूकीत उतरणार असल्याने अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचे शहरातील प्रलंबित विकास कामांचे भूमिपूजन करुन मतदारांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी लगीनघाई सुरू झाली आहे. निवडणूक वेळेवर व्हावी अशीच सर्व उमेवारांची अपेक्षा असुन त्यासाठी पाण्यात देव ठेवले आहे.


 देवळाली प्रवरा नगरपालिकेत नगराध्यक्ष कदम यांची सत्ता असून त्यांचा ५ वर्षाचा कालावधी येत्या २४ डिसेंबरला पूर्ण होणार आहे. निवडणूक लागणार का प्रशासक येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नगरपालिका निवडणुकीबाबत अद्याप कुठलीही हालचाल निवडणूक आयोगाकडून करण्यात आली नाही.वार्ड रचना व आरक्षण याबाबत अद्यादेश जारी करण्यात आलेला नाही. मात्र शहरात मोठ्या प्रमाणात इच्छूक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.

                 निवडणूक आयोगा कडून वार्ड रचने बाबत कोणतेही आदेश नसताना नागरीकांनी शहराची काल्पनिक वार्ड रचना करुन हा वार्ड तुटला, तो वार्ड इकडं जोडला याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. देवळाली शहरात एक वार्ड वाढला असल्याने 3 नगरसेवकांची भर पडणार असुन 18 वरुन 21नगरसेवक देवळाली प्रवरा नगर पालिकेत नगरसेवक होणार आहेत.संख्या वाढीमुळे मोर्चे बांधणीला वेग आला आहे.

         राहुरी फँक्टरी येथिल कारखाना कॉलनी प्रभाग ७ ला जोडली, प्रभाग ८ ला गुरुकुल वसाहत जोडलं, प्रभाग ५ ला वाणीमळा, देवळाली बंगला व वैष्णवी चौकाचा काही भाग तोडण्यात आला अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र अद्याप अधिकृत कोणतीही माहिती नसताना काल्पनिक वार्ड रचनेची नागरीकांनी तोड-फोड करुन चर्चेला उधाण आणले आहे. सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोयीचे वार्ड केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. मात्र अधिकृत वार्ड रचना झालेली नसताना केवळ सुरू असलेल्या अफवेतून इच्छुक आपली व्यूहरचना आखत आहे.अनेकांनी भावी उमेदवार म्हणून रामराम व उठबस सुरु केली आहे.

                  दुसरीकडे देवळाली प्रवरा नगरपालिकेचे सत्ताधाऱ्यांनी प्रलंबित विकासकामांचे भुमिपूजन उरकण्यासाठी लगबग सुरू केली आहे. रस्ता खडीकरण, नाल्या दुरुस्ती यासह अनेक कामाचे भुमिपूजन उरकण्याचा प्रयत्न चालू आहे.ठेकेदारांना कामास सुरुवात करण्यात सांगण्यात येत आहे.तर कामाचा दर्जा सुधारण्याचे आदेश नगराध्याचे पाठीराखे राम लक्ष्मण देत असल्याचे दिसत आहे.ठेकेदाराचे दोन्ही बाजुने सध्या मरण सुरु आहे.विरोधकांची निकृष्ट कामाच्या दर्जाकडे बारकाईने लक्ष असुन असे काम सापडले की, त्यावर राजकारणाची कढी करुन मोकळे व्हायचे याचा सपाटा लावला आहे. यापुर्वी जसे विकासाच्या मुद्द्यावर राजकारण व्हायचे ते या निवडणूकीत होणार नसुन व्यक्तीदोष राजकारणावर भर दिला जाणार आहे.त्या दुष्टीने अनेक दिवसा पासुन पावले पडत आहे. 

          


  विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर विकासात्मक मुद्द्यावर आरोप करण्यासाठी अनेक मुद्दे असतानाही केवळ टार्गेट करण्यासाठी काही राजकीय व्यक्ती व्यक्ती दोषाचे राजकारण करायचे म्हणून टिका करणे सुरु झाले आहे. देवळाली प्रवरा शहराची अनेक पिढ्यापासुन राजकारणा पुरते राजकारण केले जात होते मतदानाच्या शेवटच्या घटका पर्यंत राजकारण केले जात असे मतदान पेट्या शिल झाल्या की, दोन्ही तीन्ही पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते एकञ भेळभत्ता खाऊन चहापान घेवून आता कोणी हि निवडून येवो पाच वर्ष विकासाचे कामे करा आसे ऐकमेकाला विजयासाठी शुभेच्छा देवून राजकारण तेथे थांबवले जात होते. परंतू  या निवडणूकीत माञ खुनसी राजकारण देवळाली प्रवराच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याने निवडणूकीत अनेक वर्षाची परंपरा खंडीत होवून गालबोट लागणार असल्याचे काही जाणकार व्यक्तींनी मत व्यक्त केले आहे.


......मी घरपट्टी व पाणीपट्टी भरतो पण मला नगरसेवक करा!


देवळाली प्रवरा नगर पालिकेची निवडणूक अद्याप जाहिर झालेली नसतानाही काही भावी नगरसेवक नगरसेवक होण्याचे दिवसा स्वप्न पाहु लागले आहे.राहुरी फँक्टरी येथिल एकजण नगरसेवक होण्यासाठी संभाव्य वार्डातील नागरीकांना भेटून मी या निवडणूकीत उभा राहणार आहे.तुम्ही मला मतदान केलेच पाहिजे अशी गळ घालत आहे. त्या वार्डातील अनेक नागरीकांच्या थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आश्वासन त्याने दिले आहे. फक्त वार्ड रचना जाहिर होवू द्या ज्या नागरीकांच्या थकीत घरपट्टी व पाणीपट्टी असेल त्या नागरीकांनी मागणी नोटीस आणून द्यायची दुसऱ्या दिवशी घर व पाणीपट्टी भरल्याच्या पावत्या पोहच करण्याचे आश्वासन दिले जात आहे. निवडणूकी आधी म्हणजे पाण्यात म्हैस, आणि केवढ्याला देणार अशी अवस्था निवडणूकीपुर्वीच सुरु झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत