राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील देवळाली बंगला येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून १ लाख ५८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी ल...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील देवळाली बंगला येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून १ लाख ५८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
देवळाली बंगला येथील वरखडे-वाणी रस्त्यावर ( राऊत इंग्लिश मिडीयम शाळेच्या समोर) अशोक खराबे यांचे घर आहे. अशोक खराबे व त्यांचा मुलगा हर्षल हे ड्युटीवर गेले होते. तर अशोक खराबे यांच्या पत्नी व सुनबाई ह्या आपल्या घराला कुलूप लावून देवळाली प्रवरा येथे नातेवाईकांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते.
याचवेळी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले १ लाख ५८ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. याचवेळी खराबे यांच्या सुनबाई आपल्या नातेवाईकांसोबत घराजवळ आले असता ते चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी ही चोरी करून त्या ठिकाणाहुन पळ काढल्याचे सौ. खराबे यांनी सांगितले.
दरम्यान घटनास्थळी पोलीस हॅडकॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाठ दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासणी केले जात आहे.
भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड लंपास केल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. राहुरी तालुक्यात चोऱ्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस प्रशासनाबद्दल सामान्य नागरिकांतून चीड व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत