सेस्कॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बेकायदेशीररित्या कंपनीची उभारणी त्वरित थांबवा -छावा संघटना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सेस्कॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बेकायदेशीररित्या कंपनीची उभारणी त्वरित थांबवा -छावा संघटना

राहुरी(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 330/1 गुहा तांभेरे रोड लगत शेतीमध्ये पुणे येथील सेसकॉर्न इंडिया प्रायव्हेट ल...

राहुरी(वेबटीम)

 राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 330/1 गुहा तांभेरे रोड लगत शेतीमध्ये पुणे येथील सेसकॉर्न इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने कुठल्याही स्वरूपाचे परवानगी न घेता प्रशासकीय विविध कार्यालयाचे ना हरकत दाखले व प्रदूषण मंडळाचे मंजुरी न घेता बेकायदेशीररित्या जमिनीमध्ये बांधकाम ,खोदकाम करून गैण खणिज संपत्तीचे उत्खनन केले असून यासंदर्भात छावा क्षत्रावीर सेना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष सतीश सौदागर यांनी कंपनीवर कायदेशीर रित्या दंडात्मक कारवाई करून कंपनी चालू असलेली काम त्वरित थांबवण्याची मागणी तहसीलदार राहुरी यांच्याकडे केली आहे

सदर निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 330/1 या शेत जमीन मिळकतीमध्ये सदर कंपनीने बेकायदेशीर रित्या कंपनीचे उभारणी काम चालु केले आहे .

कंपनीने विविध शासकीय व प्रशासकीय विभागातील न हरकत दाखले परवानगी व मंजुरी न घेता कंपनी उभारण्याचे काम चालू केले आहे कंपनी ठेकेदाराला प्रशासनाने नियम अटी व शर्ती लागू केल्या होत्या त्या कुठल्याही पूर्ण न करता काम चालू केले आहे या कंपनीमुळे शेत जमीन जवळी लोकवस्ती तसेच शेती व तेथील रहिवाशांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे यामुळे विविध आजार उद्भवणार आहे.

कंपनीने कुठलेही उपायोजना केलेला नाही या क्षेत्र जमिनीमध्ये तीन कुटुंबाचा न्यायालयीन वाद चालू असुन न्याय  प्रविष्ट असल्याकारणाने ग्रामपंचायत ने कुठल्याही स्वरूपाचे परवानगी, दाखले व ना हरकत दाखले देण्यास स्थगिती ठराव मंजूर केलेला असून सुद्धा कंपनीने दडपशाही मार्गाने शेती प्लॉटचे नुकसान करून कंपनीचे काम चालू केले आहे यासंदर्भात छावा क्षत्रावीर सेना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष सतीश सौदागर यांनी राहुरी तहसीलदार यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसांमध्ये कंपनी ठेकेदार याच्यावर गुन्हा दाखल करून सदर कंपनीवर कायदेशीर रित्या दंडात्मक कारवाई करून कंपनी कामास स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे कारवाई न झाल्यास सोमवार दिनांक सोमवार 3/1 /2022 रोजी अन्यायग्रस्त शेतकरी ग्रामस्थ व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तहसील कार्यालय राहुरी यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन छेडणार आहे असे निवेदनात म्हटले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत