राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द या ग्रामीण भागातील शेतकरी कुटूंबातील भार्गवी राजेंद्र पुराणिक हिस अहमदनगर येथील आधार बहुउद्देश...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द या ग्रामीण भागातील शेतकरी कुटूंबातील भार्गवी राजेंद्र पुराणिक हिस अहमदनगर येथील आधार बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श युवा नुतन अभिनेत्री गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
भार्गवी पुराणिक ही नृत्य, अभिनय या कलेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित आहे.या उपक्रमाची दखल घेत आधार बहूउद्देशिय संस्था अहमदनगरच्या वतीने नुकतेच राज्यस्तरीय आदर्श युवा नूतन अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
युवा झी अवॉर्ड विजेते अभिनेते मोहिनीराज गटणे, सावित्रीबाई फुले विद्यापीठचे अभ्यासक, डॉ संदीप सांगळे, कारगिल युद्धतील सैनिक नारायण राऊत, आधार संस्थेचे सचिव सुदाम लगड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत