सात्रळ/वेबटीम:- सात्रळ येथील रयत शैक्षणिक संकुलात अक्षर मानव वाचनालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी *सुपर 100 रिडर्स* या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन...
सात्रळ/वेबटीम:-
सात्रळ येथील रयत शैक्षणिक संकुलात अक्षर मानव वाचनालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी *सुपर 100 रिडर्स* या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
हा स्तुत्य उपक्रम वाचनालयाचे अध्यक्ष युवानेते पंकज कडू पाटील यांनी सुरू केला.
सात्रळ पंचक्रोशीत पंकज अरुण कडू पा.यांच्या व त्यांचे अनेक युवा सहकारी यांच्या माध्यमातून विविध समाजहिताचे,समाजप्रबोधनाचे,लोक कल्याणकारी उपक्रम . राबवले जातात. गावातील ,पंचक्रोशीतील वाचनप्रेमी मुलांना तसेच आदिवासी व दलित वस्तीतील मुला-मुलींना घरोघरी जाऊन वाचनीय पुस्तके देऊन वाचन संस्कृती विकसित केली जाते. वाचनामुळे मन आणि बुद्धीचा विकास होतो आणि मोबाईल चा नको अतिवापर टाळून वाचनीय पुस्तकांच्या माध्यमातून एक चांगला पर्याय उपलब्ध करून देण्याच काम अक्षर मानव वाचनालयाच्या माध्यमातून केले जाते.वाचन संस्कृती चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अनेक पूरक उपक्रम राबविले जातात.
अशा विविध उपक्रमांच्या मालिकेतील एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे *सुपर रिडर्स उपक्रम*-वाचणारी 100 पोरं.या या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष युवानेते पंकज अरुण कडू पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व अनेक उदाहरणांसह स्पष्ट करून सांगितले. *आज वाचू,उदयाला वाचवू* हा मंत्र त्यांनी विद्यार्थांना दिला. दिला. वाचन संस्कृती वाढवणाऱ्या या उपक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विजय वाचनालनाचे व्यवस्थापक भाऊसाहेब ताजणे ,रयत सेवक संघाचे माजी सचिव भाऊसाहेब पेटकर, प्राचार्य अशोक वानखेडे, मुख्याध्यापिका सौ.अनिता निबे, पर्यवेक्षक सिताराम बिडगर , वाचनप्रकल्प समन्वयक सचिन पवार,सेवकवृंद समवेत विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश कडलग यांनी केले.तर सिराज मन्सुरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत