राहुरी मतदार संघातील तलाव दुरुस्तीसाठी रु.2 कोटी 22 लाखाचा निधी मंजुर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी मतदार संघातील तलाव दुरुस्तीसाठी रु.2 कोटी 22 लाखाचा निधी मंजुर

राहुरी(वेबटीम):- राहुरी मतदारसंघातील व तालुक्यातील ताहाराबाद,वांबोरी,धामोरी खु.गुहा ,चिंचाळे,कणगर,रामपुर तसेच नगर तालुक्यातील बहिरवाडी व इमा...

राहुरी(वेबटीम):-


राहुरी मतदारसंघातील व तालुक्यातील ताहाराबाद,वांबोरी,धामोरी खु.गुहा ,चिंचाळे,कणगर,रामपुर तसेच नगर तालुक्यातील बहिरवाडी व इमामपुर येथील पाढर तलावांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने रु.2 कोटी 22 लाख 5 हजार रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचे राज्याचे नगरविकास उर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
मंत्री तनपुरे पुढे म्हणाले की, मतदार संघातील राहुरी तालुक्यातील शेतक-यांसाठी महत्वपुर्ण वरदान ठरणा-या पाझर तलाव दुरुस्तीसाठी ताहाराबाद (19 लाख 81 हजार) ,वांबोरी (30 लाख 4 हजार) ,वांबोरी राऊत वस्ती (7 लाख 32 हजार), धामोरी खु.(14 लाख 6 हजार),गुहा खपके वस्ती (5 लाख 98 हजार ),चिंचाळे गडधे आखाडा (3 लाख 50 हजार ),कणगर घाडगे वस्ती (3 लाख 59 हजार ), रामपुर सरोदे वस्ती (4 लाख 77 हजार),रामपुर साबळे वस्ती (5 लाख 53 हजार ) तसेच नगर तालुक्यातील बहिरवाडी काळेवस्ती (28 लाख 61 हजार) ,बहिरवाडी वाकी वस्ती (48 लाख 43 हजार ) इमामपुर महादेव मंदिर रस्ता (26 लाख 85 हजार ) ,इमामपुर पालखीचा ओढा (23 लाख 56 हजार ) ,येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी एकुण 2 कोटी 22 लाखांचा निधी जिल्हा परीषद मालकीचे पाझर तलावांना मंजुर झालेला आहे. राहुरी नगर तालुक्यातील तलावांचे दुरुस्तीचे कामे ब-याच वर्षापासुन झालेले नव्हते. या तलावांची अवस्था अतिशय बिकट झाल्याने पाणी गळतीचे प्रमाणही अधिक होते. पावसाळ्यातील पाणी साचुन गळतीमुळे तलाव लवकर कोरडे पडत होते.मंत्री तनपुरे यांचेकडे येथील लाभधारक शेतक-यांनी तलाव दुरुस्तीची मागणी केलेली होती. या मागणीची त्यांनी गंभीरतने दखल घेवुन मंत्री तनपुरे यांनी शासन पातळीवर वेळोवेळी पाठपुरावा करुन जलसंधारण विभागाने या तलाव दुरुस्तीसाठी निधी मंजुर केल्याने या परीसारातील शेतक-यांचे क्षेत्र ओलीताखाली येण्यास मदत होणार असुन जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार  आहे.  तसेच राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील उर्वरीत पाझर तलावांची दुरुस्ती निधी मंजुर करणेसाठी पाठपुरावा चालु असुन लवकरच या कामांना मंजुरी मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.  याकामामुळे राहुरी तालुक्यातील व नगर तालुक्यातील लाभधारक शेतक-यांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानुन समाधान व्यक्त केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत