सात्रळ/वेबटीम:- लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या साञळ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील म...
सात्रळ/वेबटीम:-
लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या साञळ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग, प्रसिद्धी व उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष माजी मंञी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून पत्रकार दिनानिमित्त साञळ पंचक्रोशीतील पत्रकारांच्या गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. जयश्री सिनगर या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री, पद्मभूषण व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. याप्रसंगी प्राचार्यांच्या हस्ते सात्रळ पंचक्रोशीतील पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जेष्ठ पञकार विलास कुलकर्णी म्हणाले, शब्दाला खूप सामर्थ्य असते. पत्रकारांनी बातमी लेखन खूपच काळजीपूर्वक केले पाहिजे. पत्रकार हाही साहित्यिकच असतो. चांगल्या कामाचं तोंडभरून कौतुक केले पाहिजे. चुकीच्या प्रवृत्ती विरोधातही लेखन केले पाहिजे. पत्रकार बांधवांनी आमिषाला बळी पडू नये. चुकीच्या ठिकाणी अवश्य प्रहार करावा. सगळ्या गोष्टी पैशात मोजता येत नाहीत. स्वातंत्र्यपूर्वीची आणि स्वातंत्र्यानंतरची पत्रकारिता यात खूप मोठे बदल झाले आहेत. पत्रकारिता हे खूप आनंददायी काम आहे.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना डॉ. जयश्री सिनगर म्हणाल्या, चांगल्या बातमीचा प्रभाव समाजावर होत असतो. पत्रकारिता हा समाजमनाचा आरसा असतो. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डाॅ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, उपप्राचार्य दिनकर घाणे, डॉ. भाऊसाहेब नवले व प्रशासकीय कर्मचारी व सर्व उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब नवले यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत