कोपरगाव/प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात पंजाबमधील काँग्रेस सरकारने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन सुरक्षा व्यवस्थेत ज...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात पंजाबमधील काँग्रेस सरकारने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक ढिसाळपणा केला. या गंभीर चुकीचा भारतीय जनता पक्षाने (वसंत स्मृती कार्यालय) तीव्र निषेध व्यक्त केला.
याबाबत शुक्रवारी (ता.७) नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेत पंजाब सरकारने अतिशय गंभीर चुका केल्या आहेत.
याबाबत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने राष्ट्रपतींकडे कठोर कारवाईची मागणी करावी. यावेळी विजय वहाडणे, विनायक गायकवाड, प्रकाश सवाई, संजय कांबळे, वसंत जाधव, विनीत वाडेकर, किरण थोरात, प्रभाकर वाणी, योगेश वाणी, मंगेश पाटील, सुनील बंब, बाळकृष्ण भागवत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत