जेऊर कुंभारी महीला सरपंच यांना भ्रमणध्वनी वरून शिवीगाळ!! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जेऊर कुंभारी महीला सरपंच यांना भ्रमणध्वनी वरून शिवीगाळ!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यात जेऊर कुभांरी ग्रामपंचायत महीला सरपंच सुवर्ण पवार यांना अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनी वरून अश्लिल भाषेत श...

कोपरगाव प्रतिनिधी:-


कोपरगाव तालुक्यात जेऊर कुभांरी ग्रामपंचायत महीला सरपंच सुवर्ण पवार यांना अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनी वरून अश्लिल भाषेत शिवीगाळ केली आहे, सविस्तर वृत्त असे की १३.१.२०२२ रोजी सायंकाळी ७.३०वा अज्ञात व्यक्तीने ७२६३०९८९३९ व८४११८२६०९१ या मोबाईल नंबर वरून सरपंच सुवर्ण पवार ७३......०१ या नंबर फोन करून फिर्यादी  हे न ओळखनारे शामराव कानडे याने माझे २.००.००० लाख रूपये घेतले आहे व त्यांनी तुमचा नंबर मला दिला आहे .


असे म्हणून त्या अज्ञात व्यक्तीने महीला सरपंच सुवर्ण पवार यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे.सरपंच सुवर्ण पवार यांनी त्या व्यक्तीला समजावून सांगितले की हा नंबर जेऊर कुभांरी येथील सरपंच सुवर्ण पवार यांचा आहे पण ती व्यक्ती कोणतेही न आयकून न घेता अशील शिवीगाळ देण्याचे थांबेना त्या व्यक्तीने  कमीत कमी १०फोन करून शिवीगाळ व दम देण्यात आला.१४.१.२०२२ रोजी सरपंच सुवर्ण पवार, सतीश पवार, यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये भा द वी कलम ५०७ प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरूद्ध  गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक ढाकणे करीत आहेत. 



जेऊर कुंभारी गावात सरपंच सुवर्ण पवार यांना दिलेल्या शिवीगाळ बद्दल तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.गुन्हेगारास लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी  जेऊर कुभांरी ग्रामस्थांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत