सात्रळ/वेबटीम:- कोल्हार येथील पद्मभुषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण स्वंथेचे कला विद्यान व वाणिज्य महाविद्यालय येथील भूग...
सात्रळ/वेबटीम:-
कोल्हार येथील पद्मभुषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण स्वंथेचे कला विद्यान व वाणिज्य महाविद्यालय येथील भूगोल विभागाने जागतिक भूगोल दिनाचे आयोजन केले होते.राज्यात मकर संक्रांतीचा १४ जानेवारी हा दिवस ‘भूगोल दिन’ म्हणून साजरा केला जातो .या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सोपानराव शिंगोटे यानी भूगोल महर्षी प्रा. सी. डी. देशपांडे यांचा जन्म दिवस भूगोल दिवस म्हणून मानला जातो.हे, महाराष्ट्राचे शिक्षण संचालक व दिल्लीपर्यंत नव्हे तर परदेशातही नावाजलेले भूगोलतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी भूगोल विद्यार्थ्यांना भूगोलात आवश्यक असणारी मानव-पर्यावरण सहसंबंधांबाबत सम्यक दृष्टी दिली. त्याच प्रमाणे आपल्या भाषणात वसुंधरा वाचली तर संपूर्ण सजिवसृष्टी वाचू शकेल,पण सद्या आधुनिक जगात पर्यावरणाची हानी मोठया प्रमाणात होत असुन त्यास सर्वस्वी माणुस जबाबदार आहे ,त्यामूळे नजीकच्या काळात मानवाला अनेक संकटाना समोरे जावे लागेल.असे त्यानी आपल्या भाषणात मत व्यक्त केले.यावेळी डॉ राजेंद्र वडमारे प्रा परमेश्वर विखे यानी विद्यार्थाना भूगोला विषयी माहिती दिली.या कार्यकर्मास उप प्राचार्या डॉ प्रतीभा कानवडे,प्रा संगीता धिंमते डॉ प्रविण तुपे प्रा उत्तम येवले प्रा घोलप प्रा पेहरे प्रा शेळके,उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रस्ताविक व भूगोल विषयी विद्यार्थाना मार्गदर्शन भूगोल विभाग प्रमुख डॉ सोपान डाळिंबे यानी केले तर आभार प्रा पांडूरंग औटी यानी केले यावेळी भूगोल विषयाचे विद्यार्थि , विद्यार्थिनी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत