राहुरी/वेबटीम:- राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील संदिप कदम या तरूणाने खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले. त्या...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील संदिप कदम या तरूणाने खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अद्याप गुन्हा दाखल नसल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व संदिप कदम या तरुणाच्या नातेवाईकांनी उपोषण सुरू केले आहे. तर आज सायंकाळी नायब तहसीलदार श्रीमती. दंडिल मॅडम या संदीप कदम यांचा जबाब घेण्यासाठी विवेकानंद नर्सिंग होममध्ये दाखल झाल्या आहेत.
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे कि, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील संदिप भानुदास कदम या युवकाने नारायण सितराम कडू याचेकडून ७ लाख रूपये व्याजाने घेतले होते. या व्यवहाराला लिंबाजी इंगोले हे मध्यस्ती होते. पुढे त्याचे व्याज २० लाख रूपये झाले. याच व्यक्तीने पुन्हा नारायण कडू यांचेडून १० लाख रूपये घेतले. एकुण ३० लाख रुपये रक्कम झाली होती. या ३० लाख रुपयाचे ३ वर्षात म्हणजेच सन २०१५ ते २०१८ पर्यंत रुपये ६० लाख रुपये देण्याचे ठरले व या बदल्यात संदिप भानुदास कदम यांची ६० आर जमिन नारायण कडू यांना खरेदी करून दिली. तीन वर्षात ६० लाख रुपये दिल्यास वरील ६० आर जमिनीचे संदिप कदम यांना परत खरेदी पल्टी करुन देण्याचे ठरले.
दरम्यान झालेल्या व्यवहारात ६० लाख रूपये रक्कम वजा करुन उर्वरीत रहिलेली रक्कम ४३ लाख ५० हजार ही रक्कम संदिप कदम यांना नारायण कडू यांचेकडून घेणे बाकी राहिले. व त्या बदल्यात मागील ६० आर जमिनीची खरेदी पल्टी करुन देण्याचे ठरले होते. ते नारायण कडू यांनी करुन द्यावे. तसेच उर्वरीत रहिलेली रक्कम ४३ लाख ५० हजार ही रक्कम नारायण कडू यांनी संदिप कदम यांना द्यावी. असा तगादा संदिप क़दम यांनी वारंवार लावला.
नारायण कडू यांनी खरेदी पल्टी दिली नाही व व्यवहाराची उर्वरीत रहिलेली रक्कम ४३ लाख ५० हजार ही रक्कम संदिप कदम यांना दिली नाही. त्यामुळे त्याने दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही, म्हणुन वचित बहुजन आघाडी, राहुरी तालुका यांच्या वतीने तालुकाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण चालु केले. या उपोषणात शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, निलेश जगधने, साईनाथ बर्डे, नवनाथ गजर आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमा अंतर्गत नारायण कडू व इतरांवर गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. संदिप कदम यांची फसवणूक करुन संपुर्ण जमिन नाववर करुन त्याला भुमिहीन करणाऱ्या नारायण कडू व इतर यांचेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा. या व्यवहाराची चौकशी होऊन संबंधीत रब रजिस्टर दोषी आढळल्यास त्यांचेवर गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबीत करण्यात यावे. आदि मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले.
पिडित संदिप कदम या तरुणास आत्महत्येस प्रवृत करणारे नारायण सिताराम कडू , प्रकाश नारायण कडू अनिता नारायण कडू यांचेवर योग्य ती कारवाई करावी,असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या आंदोलनाला आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी देखील पाठींबा दिला आहे.
तर आज सायंकाळी नायब तहसीलदार श्रीमती. दंडिल मॅडम या संदीप कदम यांचा जबाब घेण्यासाठी विवेकानंद नर्सिंग होममध्ये दाखल झाल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत