राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करा-आ.आशुतोष काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करा-आ.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी -  शेतकरी, कष्टकरी, व्यापारी छोटे,मोठे व्यावसायिक आदी महत्वांच्या घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बांधील असलेल्या ...

कोपरगाव प्रतिनिधी - 


शेतकरी, कष्टकरी, व्यापारी छोटे,मोठे व्यावसायिक आदी महत्वांच्या घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बांधील असलेल्या व सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार जनसामान्यांच्या मनात रुजवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन राहाता तालुक्यात मजबूत करा असा संदेश श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी राहाता येथे कार्यकर्त्यांना दिला.



राहाता शहरातील मुश्ताक शहा, महंमद शेख, जीलानी शेख, मुसाभाई शेख, प्रकाश धावडे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह  आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत मकरसंक्रांतीच्या महूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत करून तिळगुळ देऊन कार्यकर्त्यांचे  तोंड गोड केले.मतदार संघातील सर्व नागरिकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देऊन कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आ.आशुतोष काळे यांनी आवाहन केले. या कार्यक्रम प्रसंगी जावेद दारुवाले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्षपदी व गुलशर शेख यांची राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.



यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, राहाता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ, अनिल टिळेकर, नगरसेवक बंडूनाना वाबळे, निवृत्ती गाडेकर, रणजित बोठे, आनंद शहा, समीर शेख, इकबाल शेख, ज्ञानेश्वर वर्पे, सोपानराव गिधाड, प्रा. अनाप, सोपानराव लांडगे, जावेद पठाण, गुड्डू पठाण, युनूस पठाण, अन्सार शेख, इब्राहिम शेख, ईलियास शहा, नवनाथ गाडेकर, मौलाना इब्राहिम पठाण आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत