कोपरगाव। प्रतिनिधी- तालुक्यातील सुरेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग श्रीरामपुर पथक क्रमांक एक ने मंगळवारी दुपारी टाकलेल्या छाप्यात काही...
कोपरगाव। प्रतिनिधी-
तालुक्यातील सुरेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग श्रीरामपुर पथक क्रमांक एक ने मंगळवारी दुपारी टाकलेल्या छाप्यात काहीच अवैध बनावट मुद्देमाल आढळुन न आल्याने पथकास रिकाम्या हाताने परतावे लागले असल्याने कारवाई बाबत नागरिका मध्ये शाशंकता व्यक्त होत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग श्रीरामपुर पथक क्रमांक हे मंगळवारी दुपारच्या सुमारास वाहन क्रमांक एम एच सतरा ए एन 0011सुमो शासकीय वाहनाने सुरेगावात एका नागरिकांच्या घरामध्ये बनावट दारु तयार होत असल्याच्या आँनलाईन तक्रारी अर्जावरुन टाकलेल्या छाप्यात पथकास काहीच आढळून न आल्याने पंचनाम्या वर समाधान मानत रिकाम्या परतावे लागले हि कारवाई फार्स कि तक्रार दाराचे समाधान ! हे सोपस्कार पार पाडण्यासाठी सहा ते सात कर्मचारी अधिकारी यांनी शासकीय वाहनाचा आधार घेत केली त्यावर शासनाचा खर्चा ईतका महसुल तरी वसुल झाला का ? महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबई येथे राज्यातील आँनलाईन तक्रारी नोंदण्यासाठी विभाग स्थापन करण्यात आला आहे तक्रार ज्या कार्यक्षेत्रातील असेल तेथिल अधिकारी यानांच तक्रारी चे निर्सन करण्यासाठी पाठवले जाते ह्या शासनाच्या भुमिके मागचे इंगीत काय हे नागरिकांना न उमजलेले कोडे आहे.
दोन महिण्यापुर्वी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बनावट दारु कारखान्यावर छापा टाकुन देशी विदेशी दारु जप्त केली होती ती बनावट दारू कोपरगाव तालुक्यात विक्री झाली असल्याचा नाशिक उत्पादन शुल्क विभाग यांना संशय असल्याने या भागात कायम छापे पडत असतात सि एल १ देशी मँन्युफँक्चर कंपनी येथे उत्पादीत झालेले मद्य बाजारात बनावट कि अस्सल हे तपासनारी मोबाईल यंत्रणा उपलब्ध नसल्याने निवडनुक काळात पांगरमल सारख्या घटना घडुन अनेकाचा विषारी दारु पिऊन जिव जातो व त्या घटनेचे धागे जिल्हा रुग्णालया बरोबर जुळले जातात हि महाराष्ट्रा साठी लाच्छनास्पद बाब आहे तक्रार दाराचे नाव गोपनीय ठेवने ह्या निर्देशांची पायमल्ली होत असेल तर उत्पादन तक्रार विभाग बंद करण्याची मागणी पुढे येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत