कोपरगाव(वेबटीम) वाढदिवस म्हटलं की सध्या परिस्थितीत डीजे आणि फटाक्यांची आतिषबाजी करत पैशाची उधळण केली जाते मात्र कोपरगाव शहरातील रसराज मेडि...
कोपरगाव(वेबटीम)
वाढदिवस म्हटलं की सध्या परिस्थितीत डीजे आणि फटाक्यांची आतिषबाजी करत पैशाची उधळण केली जाते मात्र कोपरगाव शहरातील रसराज मेडिकलचे संचालक सामाजिक कार्यकर्ते शैलेश केशवराव साबळे पाटील यांचा वाढदिवस आज शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आलाय.
शैलेश साबळे हे नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असतात आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी शहरातील प्रभाग क्र 1 मधील नगर पालिका शाळा क्र 9 मध्ये तसेच कोपरगाव ब्रँचच्या जिल्हा परिषद शाळेतील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.साबळे यांनी उत्तम दर्जाचे शालेय उपयोगी साहित्य उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आले.
यावेळी तन्मय साबळे ,अमोल शेलार,चेतन आगळे,दीपक पठारे,नानासाहेब साळवे,महेश काळे,अमोल पवार,महेंद्र परदेशी ,गणेश शेळके,किरण बागुल,सुरेश खरात,सार्थक चव्हाणके, अभिषेक शेवते, संतोष बैरागी,किरण पाईक,कलिम शेख, दीपक चव्हाण,अक्षय पवार,सौरभ व्यवहारे,रोहित आंबोरे,अनिता साळवे,कमलताई देशमुख आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत