राहुरी/वेबटीम:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मोठा आहे या आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपले स्थान निर्माण करून आप...
राहुरी/वेबटीम:-
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मोठा आहे या आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपले स्थान निर्माण करून आपली चमक जगाला दाखवून द्यावी ज्या विद्यार्थ्यांना आपला आत्मविश्वास कुठे कमी पडत आहे असे वाटत असेल तर त्याबद्दल आत्मपरीक्षण करून आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करणे व परिस्थितीवर मात करणे गरजेचे असल्याचे मत औषध निर्माण शास्त्र विभागाचे तज्ञ डॉक्टर रवींद्र लावरे यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत माहिती अशी की राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्था संचलित मिसेस सरस्वती वाणी कॉलेज ऑफ डी फार्मसी व प्रथम वर्ष बी फार्मसी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून औषध निर्माण विभागाचे तज्ञ रवींद्र लावरे संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ वाणी संस्थेचे सचिव दत्तात्रेय वाणी ज्येष्ठ पत्रकार गणेश विघे डी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉक्टर नचिकेत दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर लावरे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास कुठे कमी पडतो हे तपासणे गरजेचे आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता आहे ती स्वतः आत्मसात करून या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आपण स्वयंस्फूर्तीने विविध कला अवलंबल्या पाहिजेत सध्याचा इतिहास बघितला तर ग्रामीण भागातील विद्यार्थी आपला वेगळा ठसा विविध क्षेत्रांमध्ये उमटवत आहेत त्यांनी आपला आत्मविश्वास कधीही गमावू नये त्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करण्यास सदैव कार्यतत्पर राहू.
यावेळी संस्थेचे सचिव दत्तात्रय वाणी यांनी विद्यार्थ्यांना उपदेश करताना सांगितले की आयुष्यामध्ये नेहमी मोठे ध्येय ठेवा समाजामध्ये जगताना आपण सर्वांचा मान राखला पाहिजे आपण जे शिक्षण घेतले त्याच्याशी प्रामाणिक राहून आपण आपला व्यवसाय केला पाहिजे व आपल्या ज्ञानाचा समाजाला फायदा करून दिला पाहिजे नको त्या गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा आपले ध्येय समोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यास सर्वगुणसंपन्न विद्यार्थी नक्कीच तयार होतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील रहावे.
यावेळी पत्रकार गणेश विघे यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित केले त्याचबरोबर विद्यालयामध्ये आयोजित केल्या गेलेल्या विविध स्पर्धांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बी फार्मसी प्राचार्य वाणी: व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मिस्टर फ्रेशर कुलदीप कांबळे (प्रथम वर्ष डी फार्मसी) व मिस फ्रेशर प्रणिता फड (प्रथम वर्ष बी फार्मसी) यांना सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नचिकेत दिघे यांनी केले.या कार्यक्रमासाठी द्वितीय वर्ष डी फार्मसी चे विद्यार्थी जाधव सचिन व घोडके साक्षी यांनी सूत्रसंचालन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत