गोदावरी पुलाच्या कठड्यावर जाळी बसवावी- अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गोदावरी पुलाच्या कठड्यावर जाळी बसवावी- अँड.नितीन पोळ

  कोपरगाव/वेबटीम:- गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याची प्रकरणे समोर आली असून भवि...

 कोपरगाव/वेबटीम:-



गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याची प्रकरणे समोर आली असून भविष्यात अशा अनुचित घटना होऊ नये म्हणून गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाच्या कठड्यावर जाळी बसवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड।नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव येथील गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावरून उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याच्या मागील काही दिवसात एका पाठोपाठ अनेक घटना समोर आल्या आहेत नाशिक शहरात गोदावरी नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्यावर साधारण पाच ते दहा फूट उंचीची जाळी बसवलेली आहे हिंदू संस्कृतीत धार्मिक विधी चे साहित्य गंगा अर्पण केले जाते मात्र पुलाच्या दोन्ही बाजूनी जाळी बसविल्यास नदीत निर्माल्य टाकता येत तसेच कोपरगाव येथे गोदावरी नदी पुलावर एकांत आहे त्यामुळे आर्थिक दृष्ट्या व कौटुंबिक कारणाने नैराश्य आले तर या पुलावरून उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविणारांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढलेले आहे त्याच प्रमाणे या ठिकाणी अंधार असल्याने घातपात होत असण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे या पुलावर लाईट बसवणे आवश्यक आहे  तसेच सीसिटीव्ही कॅमेरे बसवावे या पुलाच्या दोन्ही बाजूने कोणतीही  जाळी नाही त्यामुळे काही दिवसांपासून गोदावरी नदीचा मोठा पूल "सुसाईड स्पॉट" झालेला आहे मात्र सार्वजनिक बांधकाम खाते,नगर पालिका व पोलीस प्राशसनाने आवाहन करून या पुलाच्या दोन्ही बाजूने पाच दहा फूट उंचीची लोखंडी जाळी बसवल्यास अशा अनुचित घटनांना आळा बसेल त्यामुळे योग्य ते नियोजन करून गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाच्या दोन्ही बाजूने जाळी बसवावी असे आवाहन पोळ यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत