राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- शूटिंग बाॅल फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य अँमॅच्युअर शूटिंग बाॅल असोसिएशनचे वतीने शिवनेरी क्लब राहुरी फॅक्टरी...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
शूटिंग बाॅल फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य अँमॅच्युअर शूटिंग बाॅल असोसिएशनचे वतीने शिवनेरी क्लब राहुरी फॅक्टरी येथे विभागीय शूटिंग बाॅल अजिंक्यपद स्पर्धा रविवार ९ जानेवारी रोजी पार पडली.
सदर प्रसंगी शूटिंग बाॅल फेडरेशन ऑफ इंडियाचे कौन्सिल मेंबर श्री.अतुल निकम ,महाराष्ट्र राज्य अँमॅच्युअर शूटिंग बाॅल असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कन्हेरकर , सचिव राजेंद्र पुजारी, सहसचिव दादासाहेब तुपे , उपाध्यक्ष श्री.गागरे सर , बाळासाहेब जाधव, राजेंद्र तांबे , गायकवाड सर ,जमीर शेख , गिरीश निमसे व सर्व खेळाडू उपस्थित होते.स्पर्धेतून पुणे विभागीय शूटिंग बाॅल चे पुरुष व महिला संघ निवडण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन समारंभ व समारोप श्री. अतुल निकम यांचे हस्ते करण्यात आला.पुणे, नगर व सोलापूर, पुरुष व महिला गट एकूण सहा संघ उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये महिला गट- अहमदनगर जिल्हा विजेते झाला. या संघा मध्ये खेळाडू दिव्या पुजारी, विद्या शेळके, सिद्धी घुले, तनिष्का गवळी, प्रज्ञा गडाख, सीनाय भोसले, पूजा वरपे, कावेरी संसारे, वैष्णवी वाडेकर यांचा सहभाग आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवनेरी क्लबचे खेळाडू वैभव संसारे, प्रथमेश थोरात तन्मय तनपुरे आदिंसह खेळाडूंनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत