शिक्षक संघाच्या राहुरी तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिक्षक संघाच्या राहुरी तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड

देवळाली प्रवरा(वेबटीम):- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा अहमदनगर अंतर्गत राहुरी तालुक्यातील  देवळाली प्रवरा येथे रविवारी 9 जानेवार...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा अहमदनगर अंतर्गत राहुरी तालुक्यातील  देवळाली प्रवरा येथे रविवारी 9 जानेवारी 2022 रोजी तालुकास्तरीय मेळावा पार पडला. 



गेल्या 24 ऑक्टोबर ला मंगळवेढा येथे पार पडलेल्या मेळाव्यात अहमदनगर मधील संघात बदल घडण्याचे संकेत मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर 7 डिसेंबर 2021 रोजी जिल्यातील बाळासाहेब सालके यांना अहमदनगर प्राथमिक शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. 



नियुक्ती पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारिणी या बरखास्त करण्यात आल्या. तदनंतर गेल्या रविवारी राहता तालुक्याचा मेळावा लोणी येथे घेण्यात आला. या मेळाव्यात राहता तालुक्याच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. 



त्यानंतर राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दुसरा तालुकास्तरीय मेळावा घेवून नवीन कार्यकारिणी करण्यात आली. याप्रसंगी महासंघाचे राष्ट्रीय सचिव बाळासाहेब झावरे, राज्य संघाचे सरचिटणीस आबासाहेब जगताप, महासंघटक रावसाहेब सुंबे, राज्य उपाध्यक्ष कैलास चिंधे, मा. राज्यमंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य  बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहायक संजय बोरुडे साहेब, दहातोंडे सर ( बीड ), जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके, पदवीधर जिल्हाध्यक्ष रघुनाथ झावरे, राज्य प्रतिनिधी मधुकर शिंदे, विशाल खरमाळे, बाळासाहेब देंडगे, जिल्हा प्रतिनिधी  प्रवीण पटेकर, अमोल साळवे, नागेश लगड, राहता तालुकाध्यक्ष राजेंद्र देठे, सरचिटणीस बाळासाहेब गमे आदी उपस्थित होते. 



याप्रसंगी बोलत असताना बाळासाहेब झावरे यांनी सांगितले की अहमदनगर चे अधिकृत जिल्हाध्यक्ष हे बाळासाहेब सालकेच आहे त्यामुळे इतर कोणत्याही चर्चेला अधिक महत्व देऊ नये. बाळासाहेब झावरे यांनी यावेळी असेही सांगितले की यापुढे जर कुणी संघावर टीका करण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतली जाणार नाही. बोरुडे साहेब यांनी बोलताना सांगितले की तुमचा कोणताही प्रश्न असला तरी तो प्रश्न मी स्वतः मंत्री महोदय बच्चूभाऊ कडू यांच्याकडे मांडेल. प्राथमिक शिक्षकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचे काम हे संघानेच केले असल्याची आठवण कैलास चिंधे यांनी करून दिली. आबासाहेब यांनी नवनियुक्त कार्यकारिणीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. रावसाहेब सुंबे यांनी शिक्षकांच्या प्रश्नाबाबत संघ हा कायम बांधील राहील अशी ग्वाही दिली. संघाच्या कार्यकर्त्यांना राज्य कार्यकारिणीने दिलेले बळ हे उद्याची नांदी राहील. पदवीधर अध्यक्ष रघुनाथ झावरे यांनी सांगितले.



जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके यांनी संघाची ध्येयधोरणे स्पष्ट करताना संघ हा पूर्ण ताकतीने येणाऱ्या बँकेच्या निवडणुकीत उतरेल आणि या चाललेल्या गलथान कारभाराला आळा घालेल असे सांगितले. ज्यांना गेल्या काही दिवसापासून शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल जाणीव व्हायला लागली आहे ते गेल्या काही वर्षापासून झोपलेले होते का? असा प्रश्न विचारून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यामुळे ते आम्हाला कुणी सांगण्याची गरज नाही अशी परखड भूमिका सालके यांनी मांडली. येत्या काही दिवसांत गट विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे संघाच्या अधिकृत असणाऱ्या पदाधिकारी यांनाच संघाच्या वतीने कार्यालयात येण्याचा अधिकार असेल असे पत्र देणार असल्याचेही सालके यांनी सांगितले. महासंघाचे राष्ट्रीय सचिव बाळासाहेब झावरे यांनी राहुरी तालुक्याच्या कार्यकारिणीची घोषणा केली. 


महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मुसमाडेवस्ती राहुरीच्या संगीता कुरकुटे यांची घोषणा करण्यात आली. प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष पदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती येथील उपशिक्षक अमोल मांगुडे यांची नियुक्ती करण्यात आली.



या वेळी कार्यकारिणी करताना प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष अमोल मांगुडे, सरचिटणीस गीताराम पवार, कार्याध्यक्ष नितीन भिंगारदिवे कोषाध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, कार्यकारिणी सरचिटणीस संदीप सोळसे, पाटीलबा गडधे, प्रसिद्धी प्रमुख नितीन भालेकर, उपाध्यक्ष प्रभू बाचकर, भारत भोईर, मिलन बनसोडे, सुरेश गिऱ्हे, सुरज धनवडे, संतोष गाडेकर, नाना सोमवते, उर्दू प्रतिनिधी आसिफ शेख, केंद्र प्रतिनिधी रामदास रायस्कर, सुभाष जाधव, योगेश देवराय, संजय लोहार, विनय गिरी, सुनील गुंजाळ शिक्षक संघ महिला आघाडी तालुका अध्यक्ष मंगल पठारे सरचिटणीस चित्रा पवार कार्याध्यक्ष सुप्रिया आंबेकर कोषाध्यक्ष जयश्री शेळके, कार्यकारी सरचिटणीस दिपाली चोभे, प्रसिद्धी प्रमुख अर्चना हिंगे, सल्लागार मंगल कांडेकर उपाध्यक्षा वैशाली खरमाळे, जाकिया इनामदार, अनुराधा सोमवते, स्वाती भवार, सुनिता मुरकुटे, वर्षाराणी क्षीरसागर. शिक्षक संघ उच्चाधिकार समिती अध्यक्ष अनिल आरंगळे, सरचिटणीस अंकुश कदम कार्याध्यक्ष अब्बास शेख कोषाध्यक्ष अर्जुन तुपे कार्यकारी सरचिटणीस राजेंद्र बोधक प्रसिद्धी प्रमुख हरिश्चंद्र सोनवणे शिक्षक पदवीधर संघ राहुरी तालुका यामध्ये मच्छिंद्र पटारे, जयश्री गोसावी, अनिल विधाटे, अशोक भोसले जिल्हा प्रतिनिधी वैभव ठाणगे, बाबू सुंबे, अंबादास गारुडकर, ललित मोरे, नितीन कोळसे, रमेश कांडेकर, शौकत पिंजारी, राजू होडगर, राधाकृष्ण वाघमारे यांची निवड करण्यात आली.


मेळाव्यासाठी तालुक्यातून संदीप ससाणे, सुभाष सालके, शिवाजी वारुळे, मनीषा शिंदे, गौरी कदम, राणी माळी, विठ्ठल तळपे, विलास दळवी, हसन शेख, सारिका रणदिवे यांसह मोठ्या संखेने संघप्रेमी उपस्थित होते. 



तालुकास्तरीय झालेल्या या मेळाव्याचे सूत्रसंचालन गीताराम पवार यांनी केले. अध्यक्षीय निवडीची सूचना ललित मोरे तर अनुमोदन वैभव ठाणगे यांनी दिले. प्रास्ताविक नितीन कोळसे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आंबादास गारुडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत