सात्रळ(वेबटीम) राहाता परिसराचे भाग्यविधाते व महाराष्ट्राचे माजी मंञी मा आ.राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून व त्यांच...
सात्रळ(वेबटीम)
राहाता परिसराचे भाग्यविधाते व महाराष्ट्राचे माजी मंञी मा आ.राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून व त्यांच्या निधीतून सात्रळ, सोनगाव, धानोरे पंचक्रोशी साठी सुमारे ६० लक्ष रुपयांचा भरघोस निधी रस्ता डांबरीकरणासाठी दिला.
या तिनही गावातील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आ.राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डाॅ.सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशी तील सर्व पदाधिकारी आजी माजी संचालक,सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य चेअरमन,व्हा.चेअरमन, या सर्व सन्माननीय मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले
साञळ
साञळ/पाथरे पुलाजवळ
कामाचे नाव - डांबरीकरण अंदाजे किमंत 20 लक्ष रूपये
धानोरे दिघे वस्ती मधला मळा
कामाचे नाव -डांबरीकरण अंदाजे किमंत 20 लक्ष रूपये
सोनगाव - दत्त मंदीर, सावता नगर,अनापवाडी
कामाचे नाव -डांबरीकरण अंदाजे किमंत 20 लक्ष रूपये
पंचक्रोशीत येणारी आपली गावे विखे यांच्या मतदारसंघात नसूनही भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने माजी मंञी आ राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डाॅ सुजयदादा विखे पाटील,शालिनीताई विखे पाटील यांच्यासह विखे पाटील कुटुंबियांचे यांचे तिन्ही गावच्या ग्रामस्थानी तसेच भाजपा युवा मोर्चा, नगर दक्षिण सेल मीडिया यांनी आभार मानले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत