'तो' करतोय ४५०० किलोमीटर पायी प्रवास.. काय आहे प्रकार वाचा... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'तो' करतोय ४५०० किलोमीटर पायी प्रवास.. काय आहे प्रकार वाचा...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- नाशिक येथील छायाचित्रकार ओंकार करपे यांनी लडाख ते कन्याकुमारी असा ४५०० किलोमीटरचा  पायी प्रवास सुरु  केला असुन या मा...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

नाशिक येथील छायाचित्रकार ओंकार करपे यांनी लडाख ते कन्याकुमारी असा ४५०० किलोमीटरचा  पायी प्रवास सुरु  केला असुन या माध्यमातून प्रत्येक भागातील संस्कृती समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. रविवारी सकाळी राहुरी कारखाना येथे करपे यांचे आगमन झाले असता त्यांचे माऊली प्रतिष्ठानच्यावतीने स्वागत करण्यात आले.



   ओंकार करपे हे व्यवसायाने छायाचित्रकार असून छायाचित्रण करताना वेगवेगळ्या ठिकाणचा अनुभव लक्षात घेऊन करपे यांनी लडाक ते कन्याकुमारी पायी प्रवास करण्याचा संकल्प केला. त्यानुसार करपे यांनी नाशिक येथून लडाख गाठले.  लडाख येथील लेह या ठिकाणावरून ३०ऑगस्ट २०२१ रोजी पायी प्रवासाला सुरुवात केली आहे. 



गेल्या १३० दिवसापासून लडाख येथील लेह येथून पायी प्रवास सुरु केला आहे.आजपर्यंत २८०० किलोमीटर प्रवास केला आहे.  कन्याकुमारीपर्यंत पोहचण्यासाठी ४५०० किलोमीटर पायी प्रवास करावयाचा आहे. कन्याकुमारीपर्यंत पोहोचण्यासाठी एप्रिल महिना उजेडणार आहे. 


पदभ्रमंती करणारे ओंकार करपे यांना instagram वर भेटा @Naive streets

करपे यांचे राहुरी कारखाना येथील माऊली प्रतिष्ठानच्यावतीने स्वागत करताना किशोर कोबरणे, सचिन म्हसे, ओमकार कोबरणे, पत्रकार श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, गणेश डावखर आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत