कोपरगाव/वेबटीम: कोपरगाव शहरातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या धारणगाव रोडचे काम दर्जेदार व्हावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष...
कोपरगाव/वेबटीम:
कोपरगाव शहरातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या धारणगाव रोडचे काम दर्जेदार व्हावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की धारणगाव रोड हा कोपरगाव शहरातील अत्यंत महत्वाचा व रहदारीचा रस्ता आहे गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत वाईट दुर्दशा झाली होती या रस्त्याच्या सुरुवातीलाच बस स्टॅण्ड लगत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तर शेवट छ संभाजी महाराज स्मारक आहे पश्चिम बाजू कडील सर्व गावांना जोडणारा हा महत्वपूर्ण रस्ता असून मागील काही वर्षांपूर्वी या रस्त्यावर असलेले सर्व अतिक्रमण काढून टाकले होते मात्र काही दिवसांपासून अनेक व्यावसायिकांनी या रस्त्यावर पुन्हा नव्याने आपली दुकाने थाटली आहेत या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते त्या मुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते त्यामुळे प्रवाशांना वाहन चालवताना अनेक छोट्या मोठया अपघातांना सामना करावा लागला होता नागरिकांनी अनेकदा या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी केली तर कधी मुरूम टाकून व मुरूमची माती झाली म्हणून त्यावर नगर पालिकेने पाणी मारणे सुरू केले होते त्यामुळे वाहन चालका प्रमाणेच या रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर धुळीचा सामना करावा लागला होता
मात्र विद्यमान आ आशुतोष काळे यांनी या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून दिला असून नुकतेच या रस्त्याच्या कामाचे थाटात उदघाटन देखील झाले मात्र बस स्टॅण्ड वरून नवीन नगर पालिका आणि तहसील कार्यालयात येण्यासाठी हा रस्ता जवळ असून या रस्त्याची रुंदी मोठी आहे त्यामुळे दोन्ही बाजूने भूमिगत गटारी त्यावर फूट पाथ केल्यास तसेच डिव्हाईडर,रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाईट व शोभेची झाडे लावली तर शहरात येणाऱ्या नागरिकांना आनंद वाटेल तालुक्यातील दोन्ही साखर कारखाण्यांची ऊस वाहतूक या रस्त्याने होत असते फूटपाथ केल्यास या रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनेक व्यावसायिकांची व्यवस्था होऊ शकते तसेच वाहतूकीला देखील अडथळा निर्माण होणार नाही तसेच त्यामुळे नवीन व्यावसायिक अतिक्रमणे होणार नाही त्यामुळे धारणगाव रोडचे काम केवळ नगर पालिका निवडणुक डोळ्या समोर ठेऊन न होता दर्जेदार व्हावे अशी मागणी पोळ यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत