देवळाली प्रवरा(वेबटीम) परमेश्वराच्या नामस्मरणात मोठी ताकद असून तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता हरिनामात तल्लीन होऊन भक्ती करून प्रगती साधा...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
परमेश्वराच्या नामस्मरणात मोठी ताकद असून तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता हरिनामात तल्लीन होऊन भक्ती करून प्रगती साधावी असे प्रतिपादन नेवासा येथील संत तुकाराम महाराज देवस्थानचे महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.
देवळाली प्रवरा येथे साई प्रतिष्ठान व शहरवासीय आयोजित साई पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाची सांगता शनिवारी उध्दव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली प्रसंगी. ते बोलत होते.
पुढे बोलताना उद्धव महाराज मंडलिक म्हणाले कि, साई प्रतिष्ठान सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असून आध्यत्मिक कार्यातील योगदान वाखडण्याजोगे आहे. साई प्रतिष्ठानच्या सदस्याप्रमाणे अन्य तरुणांनी धार्मिक कार्यात येऊन परमेश्वराची भक्ती साधावी असे आवाहन उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. दरम्यान या सप्ताह कालावधीत महराष्ट्रातील नामवंत कीर्तनकरांची कीर्तन, हरिपाठ आदि धार्मिक कार्यक्रम पार पडले. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वाटपाचा भाविकांनी लाभ घेतला. सप्ताह यशस्वीतेसाठी साई प्रतिष्ठानचे सदस्य व शहरवासियांनी अथक परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत