देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली बंगला येथील इच्छापुर्ती हनुमान मंदिर येथे श्रीराम मित्र मंडळ आयोजित श्री.गजानन विजय पारायण सोहळ्यास रविवार...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली बंगला येथील इच्छापुर्ती हनुमान मंदिर येथे श्रीराम मित्र मंडळ आयोजित श्री.गजानन विजय पारायण सोहळ्यास रविवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
गेल्या १२ वर्षापासून देवळाली बंगला येथील इच्छापुर्ती
हनुमान मंदिर येथे श्रीराम मित्र मंडळाच्यावतीने श्रीगजानन विजय पारायण आयोजित
केला जातो. यंदाही कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून पारायण सोहळ्यास
प्रारंभ करण्यात आला.
यावेळी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक
अध्यक्ष श्री.वसंतराव कदम यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्रींचा अभिषेक व पुजन करण्यात
आले.
यावेळी आझाद मित्र मंडळ अध्यक्ष संदिप कदम ,
तुळजापुर
पायी दिंडी सोहळा अध्यक्ष संजय कदम, श्रीराम मंडळाचे संस्थापक तथा हिंदु
रक्षक धर्म परिषद चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुभुषण दत्ता गागरे, ज्ञानदेव
कदम, सुरेश कदम, राहुरी
खरेदी विक्री संघाचे संचालक मच्छिंद्र शिंदे, केशवराव
चोळके, मंडळाच्या
अध्यक्षा सौ.जयश्रीताई तांबे, उपाध्यक्षा सौ.अलकाताई घाडगे, नंदाताई
कदम, पुष्पाताई तांबे, खजिनदार कविताताई मोरे, मनिषाताई तांबे, शैलाताई पवार, सुरेखाताई चोळके,
सुनंदाताई
कदम, ज्ञानदेव कदम, कुंडलिक कदम, शितल पवार,
उषाताई
बोरकर, छायाताई कदम, ज्योतीताई गागरे, सुशिलाताई
मोरे,धनश्री कदम, सुरेखाताई तरटे, सुरेखाताई कदम,
सुवर्णाताई
पठारे, उज्वलाताई कदम, पुजा कदम आदि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत