कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटविण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. याकामी नगराध्यक्ष विजय...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटविण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. याकामी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी रचलेल्या पायावर आमदार आशुतोष काळे यांनी कळस चढविला असल्याचे विनायक गायकवाड यांनी सांगितले.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाच नंबर साठवण तलाव पूर्ण व्हावा यासाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी संजय काळे, नितीन शिंदे यांचेसह ऑक्टोबर २०१८ मध्ये शिर्डी येथे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कंपनीचे श्री. रेड्डी यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यानंतर वहाडणे यांनी दिल्ली येथे नोव्हेंबर २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कोपरगाव शहराची पाणी टंचाई कमी व्हावी यासाठी समृद्धीच्या माध्यमातून पाच नंबर साठवण तलावाचे खोदकाम करण्याची आवश्यकता पटवून दिली. त्यावेळी गडकरी यांनी त्वरीत हैदराबाद येथे फोनवर रेड्डी यांचेशी संपर्क करून तलावाचे खोदकाम करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नगराध्यक्ष वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अभियंता वाघ, पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठका झाल्या. जमिनीतून माती-मुरूम-दगडाचे नमुने घेण्यात येऊन गायत्री कंपनीने खोदकाम करून माती-मुरूम वाहून न्यायला सुरुवात केली. पण दुर्दैवाने राजकीय अडथळे आणले गेल्याने काम मधेच थंडावले.
मात्र, त्यानंतर २०१९ मध्ये आशुतोष काळे आमदार झाले व त्यांनी राज्य शासनातील संबंधांचा वापर करून पाच नंबर साठवण तलावाच्या कामाला गती दिली.
नगराध्यक्ष वहाडणे, अनुभवी व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित सर्व शासकिय विभाग-अधिकारी यांना सोबत घेऊन पाच नंबर साठवण तलाव कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. आता राज्य शासनाच्या प्रकल्प मान्यता समितीने १२३ कोटी रूपये निधीलाही मान्यता दिल्याने साठवण तलाव व जलवितरण योजना पूर्ण होणार याची खात्री पटलेली असल्याचे विनायक गायकवाड म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत