ज्येष्ठ नागरिक समाजाचा खरा आधारस्तंभ - रमेशगीरी महाराज - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ज्येष्ठ नागरिक समाजाचा खरा आधारस्तंभ - रमेशगीरी महाराज

  कोपरगाव(वेबटीम):- कोपरगांव येथे प्रेरणा फाऊंडेशन प्रणित ज्येष्ठ नागरिक संघटना चे वतीने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम ट्रस्टचे मठा...

 कोपरगाव(वेबटीम):-


कोपरगांव येथे प्रेरणा फाऊंडेशन प्रणित ज्येष्ठ नागरिक संघटना चे वतीने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम ट्रस्टचे मठाधिपती पदी महंत रमेशगिरी महाराज यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता अशी माहिती प्रेरणा फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड . मनोज बाळासाहेब कडू पा यांनी दिली. 


महंत रामेशगिरी महाराज यांना संत जनार्दन स्वामी यांचा मोठा सहवास लाभला होता ,जनार्दन स्वामी यांची शिकवण घेऊन रमेशगिरी बाबा यांनी मार्गक्रमण केले . राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांची सेवा करण्याची संधी रमेशगिरी बाबा यांना मिळाली, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे पश्चात त्यांचे शिष्य म्हणून महंत रमेश गिरी महाराज यांचा मोठा भक्त परिवार कोपरगाव, वैजापूर आदी  तालुक्यात व सबंध महाराष्ट्रात आहे.



 रमेश गिरी बाबांच्या शिकवणीतून व संस्कारातून अनेक लोकांची व्यसने ,आजार तसेच कौटुंबिक अडचणी दूर झाल्याची अनुभूती भक्तांना आहे अशा प्रकारे समाज घडविण्याचे काम रमेश गिरी बाबा यांनी केलेले आहे व करीत आहे. अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी व उत्तरदायित्व म्हणून रमेश गिरी बाबा यांचा सत्कार प्रेरणा फाउंडेशन प्रणित नागरिक संघटना चे वतीने आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रम प्रसंगी महंत रामगिरी बाबा यांनी त्यांच्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्यासोबत गेलेल्या काळाची आठवण करून दिली व आज पर्यंत आलेला अनुभव अध्यात्मिक अनुभूती ची माहिती उपस्थित भाविकांना करून दिली त्याचबरोबर प्रेरणा फाउंडेशन प्रणित  ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कार्याचे कौतुक केले व खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन महंत रमेश गिरी महाराज यांनी सत्काराला उत्तर देताना केले.



सदर कार्यक्रम प्रसंगी  प्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. मनोज कडू ,कोपरगाव तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष  ॲड.बाळासाहेब कडू ,महंत लोहाटे महाराज ,सौ कुंदा कोऱ्हाळकर ,  ॲड विजय जाधव राहता, आदीची भाषणे झाली.


सदर कार्यक्रम प्रसंगी प्रेरणा फाउंडेशन प्रणित ज्येष्ठ नागरिक संघटनेचे  चे सचिव मोहनलाल तिवारी, खजिनदार छबुराव नजन ,बबनराव वाघ सर ,सुभाष जोशी गुरु, संजय महानुभव सर ,रितेश रणधीर ,प्रशांत कडू, मनोज नरोडे, दीपक जाधव सर डॉ. पुंजाहरी बनसोडे ,गोविंद चव्हाण ,दीपक माडीवाले माजी नगरसेविका भारती ताई वायखींडे ,शिवाजी भागवत ,सौ.दिपाली नलगे,सौ. सोनाली शिंदे ,चंद्रकांत बाविस्कर  सोनालीअनिल देसाई आदीभक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.


सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुयोग तिवारी यांनी केले व सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दौलत शिरसाठ यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत