कोपरगाव/वेबटीम:- 3 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्...
कोपरगाव/वेबटीम:-
3 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्यातर्फे कोपरगाव शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटी(medical kit) चे वाटप करण्यात आले.
खेळ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे परंतु मैदानावर खेळत असताना विद्यार्थ्यांना कळत नकळत अनेक प्रकारच्या इजा होतात, जखमा होतात यावेळी या विद्यार्थ्यांना मैदानावरच किंवा शाळेमध्येच प्राथमिक उपचार मिळावेत या उद्देशाने लायन्स क्लब कोपरगाव ने कोपरगाव शहरातील गीता प्रशाला, कन्या विद्या मंदिर,के बी पी विद्यालय, नगरपालिका शाळा नंबर 3, माधवराव आढाव विद्यालय, नगरपालिका शाळा नंबर 1 व 6, तसेच उर्दू हायस्कूल या सर्व शाळांमध्ये प्रथमोपचार पेटी चे वाटप करण्यात आले. तसेच उर्वरित शाळांमध्ये प्रथमोपचार पेटी चे वाटप लवकरच करण्यात येणार आहे असे लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे सचिव अक्षय गिरमे यांनी सांगितले. यावेळी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष राम थोरे, सचिव अक्षय गिरमे, खजिनदार सुमित भट्टड, सत्यन मुंदडा व रुपेश शिरोडे हे उपस्थित होते. सदर मेडिकल किट लायन्स क्लब कोपरगावचे सदस्य व साई अशा मेडिकल चे प्रोप्रायटर रुपेश निंबाशेठ शिरोडे यांनी प्रायोजित केले आहे त्याबद्दल राम थोरे यांनी रूपेश शिरोडे यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत