कोपरगाव/वेबटीम:- विविध खेळांमुळे विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व सुधारण्यास मदत होते तसेच त्यांच्यातील गुणांचा देखील विकास होतो. त्यामुळे स...
कोपरगाव/वेबटीम:-
विविध खेळांमुळे विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व सुधारण्यास मदत होते तसेच त्यांच्यातील गुणांचा देखील विकास होतो. त्यामुळे समता इंटरनॅशनल स्कूल प्रत्येक वर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करत असते.विविध क्रीडा प्रकारांमुळे समताच्या विद्यार्थ्यामधील शारीरिकता व मानसिकता वाढीस लागून सर्व गुण संपन्नतेकडे वाटचाल होत आहे.हा महोत्सव विद्यार्थी केंद्रित उपक्रम आहे.असे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री संदीप वर्पे यांनी केले.
समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्हा उप कार्याध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप वर्पे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले.समता स्कूलचे मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व बेरगळ आणि विविध विभागाचे विद्यार्थी प्रतिनिधी अनुष्का रोटे, तनिष्का राजेभोसले, कामरान अत्तार, पार्थ गिरवळकर , सुहानी समदाडीया, गणेश गवळी, यांनी मशाल हातात घेऊन क्रीडांगणाला एक फेरा देत क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ केला. ३१ डिसेंबर २०२१ रोजी बक्षिस वितरण मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे आणि पालक प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कूलचे मुख्य कार्यवाह श्री संदीप कोयटे यांनी केले.ते म्हणाले की, समता इंटरनॅशनल स्कूलने आयोजित केलेल्या १० व्या क्रीडा महोत्सवामुळे देशातील, परदेशातील खेळांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी,जीवनात खेळांचे महत्त्व लक्षात घेऊन समताच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या सक्षम बनावे. तसेच आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर मोबाईल चा वापर करत आहे. त्यांच्या मैदानी खेळावर लगाम लागला आहे. अशा परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन देऊन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे,त्यांचा आत्मविश्वास वाढविणे खूप गरजेचे आहे. मुलांना मोबाईल पासून विलग करणे यावर क्रीडा स्पर्धा हा एक उत्कृष्ट उपाय आहे.
समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आणि समताच्या शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर प्रसंगी मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाह श्री संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ लिसा बर्धन, उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांच्यासह समता पालक प्रतिनिधी समितीच्या सदस्या सौ राधिका शिरोडे,सौ वर्षा डमरे,सौ मधुरा जोशी,सौ वंदना राय,सौ जिग्ना पोरवाल,सौ रोहिणी वक्ते,सौ रोहिणी होन, सौ रुपाली साखरे,सौ आचल गुजराणी,सौ सारिका भुतडा,सौ किरण सोनकुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समता २०२१ चे वार्षिक क्रीडा पारितोषिक समताच्या झेनिथ हाऊसला मिळाले. प्राथमिक विभागातील मुलांमध्ये उत्कृष्ट अॅथलेटिक म्हणून इ ४ तील आर्किड गटाचे नेतृत्व करत अंश ठोळे तर मुलींमध्ये इ ५ वीतील ट्युलिप गटाचे नेतृत्व करत कृती पहाडे, माध्यमिक विभागातील मुलांमध्ये इ १० वीतील आर्किड गटाचे नेतृत्व करत समर्थ मोरगे तर मुलींमध्ये इ १० वीतील आर्किड गटाचे नेतृत्व करत नंदिनी कलंत्री हिने यश संपादन करत भरघोस बक्षिसे आणि पारितोषिके मिळवली.यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना समता स्कूलचे क्रीडा विभागप्रमुख श्री रोहित महाले,श्री उत्सव गांधी, श्री शुभम औताडे, श्री इमरान शेख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
क्रीडा महोत्सवात इ१ली ते १० वीतील सर्व विद्यार्थ्यांनी बास्केट बॉल, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, चेस, रिले, रनिंग रेस या क्रीडा प्रकारात सहभागी होऊन यश संपादन केले.यश संपादन केलेले विद्यार्थी आणि विजयी संघांना विविध प्रकारातील बक्षिसे, पारितोषिके आणि सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.क्रीडा महोत्सव यशस्वीतेसाठी समता स्कूलचे क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उत्सवाचे सुत्रसंचालन इ ९ वीतील विद्यार्थी दिव्य आढाव आणि पलक भुतडा यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्य क्रीडा प्रतिनिधी कामरान अत्तार याने मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत