कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव येथील भूमीपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांना नुकताच ज्ञानतंत्र बहुउद्देशीय सं...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील भूमीपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांना नुकताच ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने 'युवा भूषण' पुरस्कार २०२१ जाहीर झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ डफाळ यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना संस्थेच्यावतीने पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये सामाजिक कामात सततचे योगदान, भूमीपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम, पूरपरिस्थितीमध्ये असो किंवा नागरिकांच्या सुख-दुःखात वेळ न पाहता धावून जाणे, कोरोना काळात दोनशे ते तीनशे कुटुंबाना किराणा वाटप, भाजीपाला वाटप, मोकाट जनावरांना सतत आठ दिवस चारा पुरविणे, दुष्काळी परिस्थितीत झाडे स्वखर्चाने पाणी पुरवठा करून जगवणे, म्हणून त्यांना वृक्षप्रेमी म्हणून देखील ओळखलं जाते तसेच पक्षीप्रेमी म्हणून देखील ओळखलं जाते. अन्याय अत्याचाराविरोधात नेहमी लढा देणारे आंदोलने, उपोषणे, निवेदने यांच्या माध्यमातून अनेक छोटी-मोठी कामे सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी मार्गी लावली आहेत. याच सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना युवा भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत