कोपरगाव/प्रतिनिधी:- मध्य प्रदेशातील इंदोर ते शिर्डी पायी यात्रेचे सोमवारी (ता.३) कोपरगाव शहरातील मूकबधीर शाळा येथे अंबिका तरुण मित्रमंड...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
मध्य प्रदेशातील इंदोर ते शिर्डी पायी यात्रेचे सोमवारी (ता.३) कोपरगाव शहरातील मूकबधीर शाळा येथे अंबिका तरुण मित्रमंडळाने उत्साहात स्वागत केले.
दरवर्षी इंदोर येथील क्षत्रीय बाग जनसेवा समितीच्यावतीने साईभक्त पायी वारी करून साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. यंदाचे हे पंधरावे वर्ष होते. या पालखीमध्ये मनोज तारे, राजू पंचोली, रमेश मोरवानी, अनंत सोनवणे, शेखर ठाकूर, संतोष भुसारी आदी साईभक्त सहभागी झालेले आहेत.
दरम्यान, कोपरगावमध्ये या पालखीचे अंबिका तरुण मित्रमंडळातर्फे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी गौरव कोऱ्हाळकर, शुभम गायकवाड, विकी जोशी, वाल्मिक गोसावी, शेखर ठोंबरे, तुषार आभंड आदी उपस्थित होते. सर्व पदयात्रींना स्वादिष्ट जेवण दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत