अक्सा मस्जिदच्या विकासासाठी २५ लाख- ना.आशुतोष काळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अक्सा मस्जिदच्या विकासासाठी २५ लाख- ना.आशुतोष काळे

  कोपरगाव प्रतिनिधी  :-  कोपरगाव शहरातील सर्वे क्र.१०५ च्या प्रभाग क्र.१० मधील अक्सा मस्जिदच्या विकासासाठी अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र वि...

  कोपरगाव प्रतिनिधी  :- 



कोपरगाव शहरातील सर्वे क्र.१०५ च्या प्रभाग क्र.१० मधील अक्सा मस्जिदच्या विकासासाठी अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक विभागाने २५ लाख रूपये निधी दिला असल्याचे माहिती श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.


                 प्रभाग क्र. १० मधील अक्सा मस्जिदसाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात संरक्षक भिंतीसाठी १० लाख रुपये निधी दिला होता. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा निधी न मिळाल्यामुळे अक्सा मस्जिदमध्ये धार्मिक विधीसाठी मुस्लीम बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे कोपरगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी ना. आशुतोष काळे यांच्याकडे अक्सा मस्जिदसाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. मुस्लीम बांधवांना येत असललेल्या अडचणींची गांभीर्याने दखल घेवून ना. आशुतोष काळे यांनी यापूर्वीच वैशिट्यपूर्ण योजनेअंतर्गत तातडीने १० लाख रुपये निधी दिला होता व अजूनही निधी देणार असल्याची ग्वाही दिली होती त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता.


                 त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महाविकास आघाडी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने कोपरगाव शहरातील प्रभाग क्र.१० मधील अक्सा मस्जिदच्या सभामंडप, सुशोभीकरण व विकासासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांना येत असलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. सर्व धर्म समभाव जोपासतांना सर्वच जाती-धर्माच्या प्रार्थना स्थळांना आजवर मोठ्या प्रमाणावर निधी दिला असून यापुढील काळात देखील जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत