कोपरगाव शहरातील रस्त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे:-अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहरातील रस्त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे:-अँड.नितीन पोळ

कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव शहरातील जनतेला चांगले व गुणवत्तापूर्ण रस्ते मिळावे ही सर्व सामान्य जनतेची अपेक्षा होती मात्र सत्ताधारी व विरोधक यां...

कोपरगाव/वेबटीम:-


कोपरगाव शहरातील जनतेला चांगले व गुणवत्तापूर्ण रस्ते मिळावे ही सर्व सामान्य जनतेची अपेक्षा होती मात्र सत्ताधारी व विरोधक यांच्या भ्रष्ट समझोता एक्सप्रेस ने होऊ घातलेले रस्ते नित्कृष्ठ होत असून या रस्त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की नुकत्याच संपलेल्या नगर पालिकेच्या पाच वर्षांच्या काळात सुरुवातीचे साडेचार वर्षे सत्ताधारी व विरोधक यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात घालवली

कोपरगाव शहरातील जनता शहरातील रस्त्यामुळे मेटाकुटीला आली होती धूळ व खड्डे झाल्याने गावचे गावपण हरवले होते त्यामुळे शहरातील रस्ते व्हावे ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती नगर पालिका सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या २८  रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार होणार आहे असा आरोप करून सत्ताधारी गटाने हरकत घेतली कधी नव्हे ती रस्त्याची कामे ना उच्च न्यायालयात गेली मात्र जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तसतशी सत्ता धारी व विरोधक यांच्यात अश्वस्थता वाढून अखेरच्या टप्प्यात अर्थपूर्ण समझोता होऊन रस्त्यांची कामे दिमाखात सुरू झाली मात्र काल पर्यंत ज्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार दिसत होता ती कामे अव्वाच्या सव्वा रकमेची कामे सुरू केली मात्र ही कामे होत असताना या कामाचा दर्जा, गुणवत्ता यावर समझोता एक्सप्रेस मुळे डोळ्यावर अर्थपूर्ण पट्टी असल्याने कोणी लक्ष द्यायला तयार नाही रस्त्यावर टाकलेली खडी डांबर या वर कोणी बोलत नाही  या सर्वच कामात अर्थपूर्ण समझोता झाल्यामुळे विरोधक व सत्ता धारी यांनी ठेकेदार यांच्या सोबत हात मिळवणी केली असल्याचे दिसून येते त्यामुळे जनतेला रस्त्याची कामे सुरू करून धुळमुक्त रस्त्याचे स्वप्न दाखवले जात असले तरी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यात राजकर्ते यशस्वी झाले आहेत

रस्त्याच्या कामात डांबर खडी यांचे प्रमाण कमी आहे तर अनेक रस्ते दर्जेदार नाहीत अशी तक्रार नागरिक करताना दिसत आहे 

नगरपालीका  कार्यकाळ संपण्यापूर्वी रस्त्याच्या कामात समझोता करून कामे सुरू झाली मात्र ही कामे सुरू झाली असली तरी नगर सेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे कोणी पदाधिकारी लक्ष द्यायला उरले नाही

नगरसेवकांच्या अर्थपूर्ण समझोता एक्सप्रेस मुळे या रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या सर्वच रस्त्यांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी रस्त्याच्या कामाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत