राहुरी(वेबटीम):- राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे माहेगाव येथील झारेकर व आंबेडकर या दोन दलीत कुटुंबावर गावातील लोकांनी प्राणघातक हल्ला ...
राहुरी(वेबटीम):-
राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे माहेगाव येथील झारेकर व आंबेडकर या दोन दलीत कुटुंबावर गावातील लोकांनी प्राणघातक हल्ला केला.सदर गुन्हा दाखल होऊन देखील अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची आरोपीवर कारवाई केले नसल्याचा आरोप करून पीडित कुटुंब हे चर्मकार व मागासवर्गीय असून आरोपीवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
राहूरी पोलीस स्टेशन हद्दीत 8 जानेवारी रोजी दलित कुटुंबीयांना गावातील जमावाने मारहाण केल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन,15 दिवस होऊन ही अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नसून त्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पोटे,महिला अध्यक्ष मनीषा ताई पोटे, विजय कांबळे राजाभाऊ कांबळे, प्रशांत कांबळे, विजय मिसाळ कैलास चिंधेसाहेब रमेश झारेकर आरून झारेकर सुरेश झरेकर आदी उपस्थित होते.
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील,मौजे माहेगाव, येथील झारेकर आणि आंबेडकर,या दोन दलित कुटुंबियांना गावातील उच्चभ्रू कुटुंबातील लोकांनी व बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या सराईत गुन्हेगार,तसेच इतर काही अनोळखी इसम यांनी लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व घटनेच्याच रात्री घरावर दगडफेक केली,त्या वेळी पीडित कुटुंबातील सर्व परिवार रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने पीडित कुटुंबीयांना दवाखान्यात घेऊन गेले असता,आरोपींनी पीडित कुटुंबीयांच्या घरी असणाऱ्या काही जणांना धमकावले व शिवीगाळ केली.आणि एव्हडे होऊन देखील अद्याप पर्यंत आरोपी मोकाट फिरत आहेत आणि पीडितांना धमकावत आहेत.सदर प्रकरणांमधील जे कुणी आरोपी असतील त्या आरोपींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे,आणि आरोपींवर तत्काळ कार्यवाही करावी. या मागणीचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना देण्यात आले.सदरील प्रकरणांमधील आरोपींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत