विरोधाकांचे नाटकी आंदोलनं जनतेनेच समोर आणली- सभापती गडाख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विरोधाकांचे नाटकी आंदोलनं जनतेनेच समोर आणली- सभापती गडाख

पानेगांव (वार्ताहर)-  विरोधकांचे नाटकी आंदोलनं तालुक्यातील जनतेबरोबर जिल्ह्यातील जनतेने समोर आणली असल्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच...

पानेगांव (वार्ताहर)- 


विरोधकांचे नाटकी आंदोलनं तालुक्यातील जनतेबरोबर जिल्ह्यातील जनतेने समोर आणली असल्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव न घेता बोचरी टीका अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख यांनी तामसवाडी (ता.नेवासे) येथे एक कोटी कामांचा उद्घाटन तसेच लोकार्पण कार्यक्रमात  बोलत होते.

अध्यक्षस्थानी मुळाचे माजी संचालक बाबासाहेब जगताप हे होते.

सभापती गडाख यांनी आपल्या भाषणात विरोधाकांचा चांगलाच समाचार घेवून पोरकटपणा चव्हाट्यावर आणून देवून अनेक उदाहरणं या वेळी दिले. विरोधकांनी गडाखांवर आरोप करण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नसून विकास कामात खो घालण्याचे पाप काही मंडळी करत आहे. तालुक्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख जवळपास पाचशे ते सातशे कोटी रुपयांचे काम सुरु असल्याचे सांगून जिल्हापरिषद माध्यमातून खरवंडी गटात विक्रमी कामा बरोबरच साडे आठ हजार घरकुल तसेच लवकरच ड यादी घरकुल कामं सुरु होणार असल्याचे सांगून पशुसंवर्धन विभागात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल यासाठी प्रयत्नशिल असून

  शैक्षणिक,आरोग्य, कृषी संशोधन प्रकल्प नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. खरवंडी गटातील विकास बघण्यासाठी राज्यभरातील लोकं येतील असा विश्वास व्यक्त करुन जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांना मोठी ताकद देण्यासाठी आता पासूनच कामाला लागण्याचे यावेळी सभापती गडाख यांनी सांगितले.

तामसवाडी संस्थेचे माजीअध्यक्ष सारंग फोफसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पुर्वी पासूनच विकासापासून खरवंडी गट हा वंचित होता. जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख तसेच सभापती सुनिल गडाख यांनी भरभरून निधी उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त केले

लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत जगताप यांनी यावेळी सांगितले की, तामसवाडीत एक कोटी ४२लाखांचे रेकॉर्ड ब्रेक काम एकाच वेळी सुरू झाल्याचं आनंद प्रत्येक नागरिकाला अभिमानास्पद असून उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत विक्रमी मतदानरुपाने आम्ही निश्चितच परतफेड करु म्हणताच टाळ्यांचा गजरात ग्रामस्थांनी स्वागत केले.

कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार  मुळाचे संचालक संजय जंगले, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष सोपानराव पंडीत, नामदार शंकरराव गडाख युवा मंचाचे जिल्हाप्रमुख धनंजय पाटील,अरुण लाटे,संजय काळे, मुकुंद भोगे,सुदाम आरसुळे  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम फोफसे, भिकाजी जगताप, आबासाहेब फाटके, दादासाहेब निपुंगे, बापूसाहेब भोगे, भय्या राजळे,तानाजी गायकवाड,राजेंद्र टेमक, रमेश कोलते, काशिनाथ फोफसे,राम कोलते, रमेश कोलते, गोवर्धन आयनर, शंकर आयनर, नंदकुमार कर्जुले, कर्णासाहेब औटी,आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन राजेंद्र काळे  प्रस्ताविक उद्योजक देवीदास जगताप आभार ग्रामविकास अधिकारी रजनीकांत मोटे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत