देवळाली प्रवरात ११वी व १२ वी विज्ञान शाखेची प्रश्नपञिका फुटली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात ११वी व १२ वी विज्ञान शाखेची प्रश्नपञिका फुटली

  देवळाली प्रवरा(राजेंद्र उंडे):-   अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे देवळाली प्रवरा येथील श्री.छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यम...

 देवळाली प्रवरा(राजेंद्र उंडे):-



  अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे देवळाली प्रवरा येथील श्री.छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्ञ, रसायणशास्ञ, गणित या विषयाचे प्रथम सञ परीक्षा होण्यापुर्वीच दोन दिवस अगोदर या तिन्ही विषयाच्या प्रश्नपञिका विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असली तरी प्राचार्य विनोद अकोलकर यांनी माञ आमच्या शाळेतून प्रश्नपञिका  फुटलीच नाही असा पविञा घेतला आहे.परंतू प्राचार्य अकोलकर यांनी शुक्रवारी पोलिसांच्या मदतीने प्रश्नपञिका फुटीचा तपास केला असता एका विद्यार्थीनीच्या मोबाईल मध्ये प्रश्न पञिका सापडली असून त्याचे धागेदोरे नगर येथिल एका विद्यार्थ्यांनी पर्यंत पोहचले आहे.प्रश्नपञिका फुटीसंदर्भात पोलिसाकरवी विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले होते.






             या संदर्भात काही पालकांकडून समजलेली माहीती अशी की, इयत्ता 11 वी व १२ वी विज्ञान शाखेची प्रथम सञ परीक्षा  चालू आहे. भौतिशास्ञ, रसायण शास्ञ, गणित आदी विषयांची परीक्षा होण्यापुर्वीच काही विद्यार्थ्यांकडे या तिन्ही विषयांच्या प्रश्नपञिका मोबाईलवर व्हायरल झाल्या असल्याची तक्रार पालकांकडून होत आहे.पालकांच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी प्राचार्य अकोलकर यांनी देवळाली प्रवरा पोलिस चौकीतील पोलिस शशिकांत वाघमारे यांना शाळेत बोलावून घेत.प्रश्नपञिका फुटी संदर्भात विद्यार्थ्यांकडे चौकशी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे चौकशी केली असता एका विद्यार्थ्यांनीच्या मोबाईलवर प्रश्नपञिका आढळली. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता नगर येथिल तिच्या मैञणिने प्रश्नपञिका पाठवली असल्याचे समजते.प्रश्नपञिका फुटीचा तपास करत असताना पोलिसांकरवी विद्यालयाच्या कँम्पस मधील विद्यार्थ्यांच्या दप्तरातील मोबाईल जप्त करण्यात आले.त्याच बरोबर काही विद्यार्थी कँम्पस बाहेरील दुकानात ठेवलेले मोबाईल पोलिसाच्या मदतीने जप्त करण्यात आले.





            पोलिसांच्या तपासातून प्रश्नपञिका फुटीचा तपास लागला परंतू  विद्यालयाच्या प्राचार्याची लेखी फिर्याद नसल्यामुळे पोलिसांनी पुढील कार्यवाही टाळली असल्याचे समजते. मोबाईल जप्ती प्रकरणी शनिवारी सकाळी पालकांना विद्यालयात बोलावून जीवशास्त्र प्रयोगशाळेत बंद दरवाजाआड  बैठक घेण्यात आली. पालकांचे ठेकेदार व्यासपिठावर बसुन प्रश्न सोडविण्याचे खलबत बंद खोलीत का करण्यात आले. असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.




 गेल्या काही दिवसापुर्वी विद्यार्थ्यांकडून स्वच्छतागृहाच्या इमारतीच्या कडेने जे खड्डे होते ते विद्यार्थ्यांकडून  बुजविण्यात आले. चार ते पाच दिवस सलग मातीचे काम या विद्यार्थ्यांकडून करुन घेतले आहे. हे काम करत असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय असा प्रश्न यावेळी काही पालकांनी उपस्थित केला आहे.अंगमेहनतीचे कामे विद्यार्थ्यांकडून करुन घेत असताना पालकांचे ठेकेदार गप्प का बसला? असे ही विचारले जात आहे.

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत