संत ज्ञानेश्वर इं. मिडीअम स्कूल मध्ये १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण मोहीम संपन्न. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संत ज्ञानेश्वर इं. मिडीअम स्कूल मध्ये १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण मोहीम संपन्न.

कोपरगाव/वेबटीम:- कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात मागील दोन वर्षा पासून थैमान घातले असून अनेक नागरिकांचा पहिल्या व दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला....

कोपरगाव/वेबटीम:-


कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात मागील दोन वर्षा पासून थैमान घातले असून अनेक नागरिकांचा पहिल्या व दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला. या अनुषंगाने केंद्र शासनाने करोना महामारी पासून संरक्षण व्हावे म्हणून १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण मोहीम हाती घेतली. तसेच विद्यार्थी हे देशाचे भविष्य असल्याने  आता १५ ते १८ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण देशभरात सुरू आहे. त्या अनुषंगाने एक पाऊल पुढे टाकत संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र झावरे,उपाध्यक्ष श्री.किरण भोईर व कार्यकारी विश्वस्त श्री.विशाल झावरे यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित रहावे व त्यांच्या शिक्षणात आरोग्याच्या कुठल्याही अडचणी येऊ नये यासाठी तातडीने लसीकरण करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून संबंधितांना यासाठी सुचना दिल्या. त्या सूचनेनुसार संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल, मातोश्रीनगर, जेऊर पाटोदा मध्ये लसीकरण मोहिमेसाठी उत्कृष्ट सजावट करण्यात आली व टाकळी ब्राम्हणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री.तोडकर एस.एस,श्री.चव्हाण ए. एन,समुदाय अधिकारी श्रीमती सदाफळ,श्रीमती माळी एम.बी,आशा सेविका कु. गायत्री पंडित यांच्या मदतीने व मार्गदर्शनाने शाळेतील सर्व १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या वेळी शाळेच्या वतीने श्री.विजय शिंदे,शिक्षिका सौ.वसुधा झावरे,सौ.प्रियांका सोनवणे,शिक्षकेत्तर कर्मचारी कु.अक्षय नन्नावरे,रविंद्र पवार व सौ. सुवर्णा दिवटे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण मोहिमेसाठी मदत केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत