नगराध्यक्षांनी कोपरगाव शहरा बद्दल बोलावे पंतप्रधानांची काळजी करायला केंद्र सरकार समर्थ आहे- काँग्रेस नेते आकाश नागरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगराध्यक्षांनी कोपरगाव शहरा बद्दल बोलावे पंतप्रधानांची काळजी करायला केंद्र सरकार समर्थ आहे- काँग्रेस नेते आकाश नागरे

कोपरगाव/प्रतिनिधी:- माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पंजाब येथील पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून पंजाब सरकारवर ...

कोपरगाव/प्रतिनिधी:-



माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पंजाब येथील पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून पंजाब सरकारवर टीका करण्यापेक्षा कोपरगाव शहरात मागील पाच वर्षे काय कामं केली याचा हिशोब जनतेला द्यावा असा सल्ला काँग्रेस पक्षाचे युवा नेते आकाश नागरे यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी देशातील सर्वोच्च संस्था चोवीस तास तैनात असतात आणि सर्व गोष्टींची काळजी घेऊनच त्यांचे कार्यक्रम नियोजित केले जातात. पंजाब येथील काँग्रेस सरकारने केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणांना सोबत घेऊन दौरा नियोजित केला होता म्हणून पंजाब सरकारच्या व विरोधात बोलण्याची गरज नसुन कोपरगाव च्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी ऐतिहासिक मतदानाने निवडून दिले परंतु त्यानंतर शहराची काय अवस्था झाली हे सगळ्यांना माहीत आहे शहराचा विकास साधण्यात ते  पूर्णपणे अपयशी झाले.त्यांना स्वतःचे राजकीय अस्तित्व संपण्याची भीतीपोटी ते पंजाब येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षावर टीका करून कोपरगाव च्या जनतेला मूलभूत प्रश्नापासून दुर्लक्षीत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

परंतु त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश येणार नसून कोपरगाव चे मतदार त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये योग्य जागा दाखवतील असा विश्वास नागरे यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत