अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जामीन झाल्यानंतर कर्जत पोलिसांकडून पुन्हा अटक.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जामीन झाल्यानंतर कर्जत पोलिसांकडून पुन्हा अटक..

  नगर विशेष/प्रतिनिधी-: कर्जत पोस्टे गुरनं. 761/2021 भादंवि कलम 363 प्रमाणे दि.16/12/2021 रोजी दाखल झाला असुन फिर्यादी यांनी फिर्याद दिली की...

 नगर विशेष/प्रतिनिधी-:




कर्जत पोस्टे गुरनं. 761/2021 भादंवि कलम 363 प्रमाणे दि.16/12/2021 रोजी दाखल झाला असुन फिर्यादी यांनी फिर्याद दिली की फिर्यादीची बहिण हिस आरोपी नामे प्रकाश चंद्रकांत वगरे रा.गलांडवाडी, ता.कर्जत हा काहीतरी आमिष दाखवुन फुस लावुन कायदेशिर पालकाच्या ताब्यातुन पळुन घेवुन गेला आहे अशा फिर्यादीवरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास हा तपासी अंमलदार पोना प्रवीण अंधारे हे करित होते. गुन्हयातील अपहरीत मुलगी व आरोपी हे कुळधरण ता. कर्जत येथे येणार असेलबाबत गोपनिय बातमी मिळाल्याने दि.25/12/2021 रोजी अपहृरीत अल्पवयीन मुलगी व आरोपी नामे प्रकाश त्रिंबक वगरे वय 22 वर्षे रा-गलांडवाडी ता-कर्जत जि.अ.नगर यांना कुळधरण येथुन ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले असता दरम्यान आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार झालेबाबत न सांगणेसाठी दबाव टाकला होता. पीडित मुलीने आरोपीचे दबावामुळे पोलीसांसमक्ष तिचेवर आरोपीने कोणताही अत्याचार केला नसलेबाबत सांगितले होते. सदर अल्पवयीन मुलीस मा.बालकल्याण समिती अहमदनगर यांचेसमोर हजर करुन तिने तिचे पालकांकडे जाण्यास नकार दिल्याने त्यांचे ताब्यात दिले होते व आरोपीस अटक करुन मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.कर्जत यांचे न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपीची जामीनावर मुक्तता केली होती. यातील पिडीत अल्पवयीन हिने दि.29/12/2021 रोजी पुन्हा पोलीसांसमोर अत्याचार केलेबाबत माहिती दिली. पीडित मुलीचे जबाबावरुन नमुद गुन्ह्यास भादंवि कलम 376(2)(i)(j)(n),376(3) बा.लै.अ.सं कायदा 2012 कलम 3,4,5(L) व 6 प्रमाणे वाढीव कलम लागल्याने सदरचा तपास हा सपोनि गावीत सो.यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.

यातील आरोपीचा मा.न्यायालयात जामीन झाल्याने त्यास पुन्हा अटक करुन त्याची कोठडी घेण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते,मा.पोलीस निरीक्षक श्री.चंद्रशेखऱ यादव सो.यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ सतिष गावीत व त्यांचे रायटर पोकॉ/संतोष फुंदे यांनी मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.कर्जत यांचे न्यायालयात रिपोर्ट देवुन मा.न्यायालयातुन आरोपीचा जामीन रद्द करुन घेतला व त्यानंतर सदरच गुन्हा हा पोक्सो कलमांतर्गत असल्याने तातडीने मा.विशेष न्यायदंडाधिकारी सो.जिल्हा व सत्र न्यायालय,श्रीगोंदा यांची आरोपीस तपासकामी पुन्हा ताब्यात घेण्याची परवानगी मिळवली.परंतु तोपर्यंत नमुद आरोपी हा फरार झाला होता,पोलीसांपुढे आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याचे आव्हान होते,परंतु आरोपी त्याचे वास्तव्याचे ठिकाण बदलत होता.दि.06/01/2022 रोजी आरोपी श्रीगोंदा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदरचे गांभीर्य ओळखुन मा.पोलीस निरीक्षक श्री.चंद्रशेखऱ यादव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ सतिष गावीत,पोकॉ/संतोष फुंदे,चापोकॉ/बेग यांनी श्रीगोंदा येथे जावुन शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले व त्यास पुन्हा अटक करुन मा.न्यायालयासमोर हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.


  ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,

अपर पोलिस अधिक्षक, सौरभ अग्रवाल,

उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस अंमलदार प्रवीण अंधारे, शाम जाधव, संतोष फुंदे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत