नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी ' यांची' वर्णी लागणार? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी ' यांची' वर्णी लागणार?

अहमदनगर/वेबटीम:- नगरचे सध्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याला नगरच्या पालकमंत्री पदाच्या जबाबदारीतून कार्यमुक्त करावे अशी वरिष्ठांना ...

अहमदनगर/वेबटीम:-


नगरचे सध्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याला नगरच्या पालकमंत्री पदाच्या जबाबदारीतून कार्यमुक्त करावे अशी वरिष्ठांना विनंती केली होती त्यामुळे नगर जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत असताना यासाठी राज्याचे गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटील यांच्यावर नगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी टाकण्यात आली असल्याची माहिती समजते. ना वळसे पाटील हे शुक्रवार २८ जानेवारीला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.



  महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर  कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांच्यावर नगरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी टाकण्यात आली होती.हसन मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री असून कोल्हापूर येथील अनेक संस्थांची जबाबदारी त्यांच्यावर आहे अशा परिस्थितीत त्यांनी आपल्याला नगरच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. नगरचे पालकमंत्री म्हणून प्राजक्त तनपुरे यांचे नाव देखील प्राथमिकतेवर होते. मात्र अखेर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे नगरच्या पालकमंत्री पदाचा पदभार सोपवण्याचे ठरलेले आहे. आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हेच नगरचे पालकमंत्री झाल्याने नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीला देखील आळा बसण्याची अपेक्षा जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत