सात्रळ महाविद्यालयात वर्क कंपलाईन सिस्टिम याविषयावर कार्यशाळा संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ महाविद्यालयात वर्क कंपलाईन सिस्टिम याविषयावर कार्यशाळा संपन्न

सात्रळ/वेबटीम:- लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, सात्रळ (ता. राहुरी) येथील कल...

सात्रळ/वेबटीम:-


लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, सात्रळ (ता. राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व आयक्युएसी अंतर्गत प्राध्यापकांसाठी "वर्क कंपलाईन सिस्टीम" याविषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत पस्तीस प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.



       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. (डॉ.) सोमनाथ घोलप होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. दिनकर घाणे, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. रामदास बोरसे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत विषय तज्ज्ञ म्हणून पीव्हीपी कॉलेज लोणी येथील प्रा. एस. आर. गागरे, प्रा. डी. बी. नेहे यांनी उपस्थित प्राध्यापकांना प्रात्यक्षिकासह ट्रेनिंग दिले. अध्ययन-अध्यापन, संशोधन, नाविन्यपूर्ण कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचे उपयोजन तसेच दैनंदिन कामकाजाची सविस्तर नोंद करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. 

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. वैभव दिघे, प्रा. सुधीर वाघे, प्रा. तुषार कडस्कर, प्रा. स्वाती कडू, प्रा. अश्विनी साळुंखे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रा. हरि दिवेकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत